IPL 2026: एका ओव्हरमध्ये 43 रन आणि 7 सिक्स ठोकणारा चेन्नई सुपर किंग्सचा तुफान फलंदाज चर्चेत; कोण आहे हा पठ्ठ्या?

Unique Cricket Record: ऋतुराज गायकवाडने एका ओव्हरमध्ये 7 सिक्स ठोकत 43 धावांचा विक्रम केला होता. मात्र IPL 2026 मध्ये त्यांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही.
Unique Cricket Record
Unique Cricket RecordPudhari
Published on
Updated on

Ruturaj Gaikwad 7 Sixes Record: IPL सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळण्याचं स्वप्न प्रत्येक क्रिकेटपटू पाहत असतो. या लीगमुळे अनेक खेळाडूंसाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले आणि एका रात्रीत करिअर बदललं. पण या प्लॅटफॉर्मवर टिकून राहणं खूप कठीण आहे. याच लीगमध्ये खेळणाऱ्या एका भारतीय फलंदाजाने एकेकाळी असा विक्रम केला होता, जो ऐकून आजही चाहते थक्क होतात, एका ओव्हरमध्ये तब्बल 43 धावा आणि 7 सिक्स मारले होते.

हा पराक्रम करणारा खेळाडू म्हणजे ऋतुराज गायकवाड. महाराष्ट्राकडून विजय हजारे ट्रॉफीत खेळताना गायकवाडने हा ऐतिहासिक विक्रम केला होता. त्या सामन्यात त्याने 159 चेंडूत तब्बल 220 धावांची तुफानी खेळी केली होती. या डावात 16 षटकार आणि 10 चौकारांची आतषबाजी त्याने केली होती. विशेष म्हणजे एका षटकात टाकलेल्या नो-बॉललाही त्याने षटकार मारत एकूण 43 धावा काढल्या होत्या.

पण क्रिकेटचं वैशिष्ट्यच असं आहे की कालचा हिरो आज संघर्ष करताना दिसत आहे. IPL 2026 मध्ये गायकवाडची कामगिरी मात्र अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. सहा सामन्यांमध्ये त्याला एकही अर्धशतक करता आलेलं नाही, त्यामुळे त्याच्यावर टीका होत आहे. फलंदाज म्हणूनच नव्हे तर कर्णधार म्हणूनही त्याच्या समस्या वाढल्या आहेत.

Unique Cricket Record
Tobacco Poverty Trap: तंबाखू सोडल्यानंतर 10 टक्के भारतीय श्रीमंत होतील; अभ्यासात महत्त्वाचा खुलासा

चेन्नई सुपर किंग्सच्या नेतृत्वाची जबाबदारी त्याच्याकडे आहे, पण आतापर्यंतच्या सहा सामन्यांपैकी फक्त दोनच सामने संघाला जिंकता आले आहेत. त्यामुळे संघाचं प्लेऑफचं गणितही कठीण झालं आहे. पुढील आठ सामन्यांपैकी किमान सहा सामने जिंकणं संघासाठी आवश्यक असणार आहे.

Unique Cricket Record
Shreyas Iyer : श्रेयस अय्यरकडून युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीवर कौतुकाचा वर्षाव, म्हणाला; ‘तो भविष्यातील देदीप्यमान तारा’

गायकवाडचा IPL प्रवासही तितकाच प्रभावी राहिला आहे. 2021 पासून CSK कडून खेळताना त्याने 77 सामन्यांत 2584 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 20 अर्धशतकं आणि 2 शतकंही आहेत. त्यामुळे त्याच्याकडे क्षमता आहे, फक्त फॉर्म परत मिळवण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news