

पाकिस्तानच्या हवाई दलाच्या ताफ्यातील F-16 विमानांना मोठे अपग्रेड मिळणार
अपग्रेड्स प्रामुख्याने विमानांची सुरक्षितता वाढवण्यासाठी
भारताचे घडामोडींवर बारकाईने लक्ष
US Pakistan defence deal
वॉशिंग्टन: अमेरिकेने पाकिस्तानच्या F-16 लढाऊ विमानांसाठी (F-16 Fighter Jets) ६८६ दशलक्ष डॉलर्स किमतीच्या मोठ्या तंत्रज्ञान विक्रीला मंजुरी दिली आहे. या करारामुळे पाकिस्तानच्या हवाई दलाच्या (Pakistan Air Force) ताफ्यातील F-16 विमानांना मोठे अपग्रेड मिळणार आहे.
F-16 लढाऊ विमानांसाठी अमेरिकना अत्यंत प्रगत कमांड, कंट्रोल, कम्युनिकेशन्स आणि इंटेलिजन्स (C4I) प्रणाली आहे. या सुरक्षित रिअल-टाइम कम्युनिकेशन नेटवर्कमुळे मित्र राष्ट्रांच्या सैन्यामध्ये सामरिक डेटाची देवाणघेवाण करणे शक्य होते. विशेष म्हणजे ही प्रणाली शत्रूच्या इलेक्ट्रॉनिक जॅमिंगलाही प्रतिरोध करते.
हे अपग्रेड्स प्रामुख्याने विमानांची सुरक्षितता वाढवण्यासाठी, कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि अमेरिकेचे सैन्याबरोबर समन्वय साधण्यासाठी (डिझाइन केलेले आहेत 'लिंक-16' (Link-16) डेटा लिंक सिस्टीम हे एक अत्यंत प्रगत, सुरक्षित आणि रिअल-टाइम कम्युनिकेशन नेटवर्क आहे. यामुळे पाकिस्तान हवाई दल अमेरिकन आणि नाटो (NATO) मित्र राष्ट्रांच्या सैन्यासोबत लढाईच्या वेळी त्वरित आणि सुरक्षितपणे सामरिक माहिती (Tactical Data) आणि डेटाची देवाणघेवाण करू शकेल. हे प्रणाली शत्रूच्या इलेक्ट्रॉनिक जॅमिंगलाही प्रतिरोध करते. क्रिप्टोग्राफिक उपकरणे गोपनीय संदेश आणि डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी ही उपकरणे बसवण्यात येतील, ज्यामुळे कम्युनिकेशनमध्ये गोपनीयता (Confidentiality) कायम राहील. एव्हीऑनिक्स अपडेट्स (Avionics Updates)विमानातील इलेक्ट्रॉनिक आणि नियंत्रण प्रणालींचे आधुनिकीकरण करणे. यात कॉकपिट डिस्प्ले, नेव्हिगेशन आणि सेन्सॉर सिस्टीम समाविष्ट असू शकतात, ज्यामुळे वैमानिकाला (Pilot) विमानाचे नियंत्रण आणि युद्धभूमीची माहिती अधिक स्पष्टपणे मिळेल.
आधुनिक तंत्रज्ञान विक्रीचा उद्देश पाकिस्तानच्या F-16 विमानांचे आधुनिकीकरण करणे हा आहे. हे अपग्रेड 'ब्लॉक-52' आणि 'मिड लाईफ अपग्रेड' (MLU) F-16 विमानांची सध्याची आणि भविष्यातील धोक्यांचा सामना करण्याची क्षमता टिकवून ठेवेल. अमेरिकेने स्पष्ट केले आहे की, ही विक्री अमेरिकेच्या परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षा उद्दिष्टांना मदत करेल. यामुळे दहशतवादविरोधी (प्रयत्नांमध्ये अमेरिका आणि पाकिस्तानच्या सैन्यामध्ये परस्पर सहकार्य कायम राहील. या उपकरणांच्या विक्रीमुळे प्रदेशातील मूलभूत लष्करी संतुलन बदलणार नाही, असा दावाही करण्यात आला आहे.
F-16 विमानांची निर्मिती करणारी टेक्सास-स्थित लॉकहीड मार्टिन कंपनी या विक्रीसाठी मुख्य कंत्राटदार असेल.या कराराच्या अंमलबजावणीसाठी अमेरिकेचे कोणतेही अतिरिक्त सरकारी किंवा कंत्राटदार प्रतिनिधी पाकिस्तानला पाठवण्याची गरज भासणार नाही, असेही अमेरिकेच्या संरक्षण एजन्सीने स्पष्ट केले आहे.
अमेरिकेच्या डिफेन्स सिक्युरिटी कोऑपरेशन एजन्सीने (DSCA) अमेरिकन काँग्रेसला पाठवलेल्या पत्रानुसार, या कराराची एकूण अंदाजित किंमत ६८६ दशलक्ष डॉलर्स आहे. यातील मुख्य संरक्षण उपकरणांची किंमत ३७ दशलक्ष डॉलर्स असून, इतर वस्तूंची किंमत ६४९ दशलक्ष डॉलर्स आहे.या करारामुळे अमेरिकेत ३० दिवसांचा पुनरावलोकन कालावधी सुरू झाला आहे. या काळात अमेरिकन कायदेमंडळाकडून याची छाननी होण्याची अपेक्षा आहे. भारताने या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवले आहे.