

lawyer Rakesh Kishore assaulted
नवी दिल्ली : माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील राकेश किशोर याला दिल्लीच्या कडकडडूमा कोर्ट परिसरात चपलेने मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, या प्रकरणी कोणतीही औपचारिक तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. तसेच या हल्ल्यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.
कोर्ट परिसरात वकिलावर चपलेने हल्ला करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे, मारहाण सुरू असताना वकील राकेश किशोर हे 'सनातन धर्म की जय' अशा घोषणा देताना दिसत आहेत.यावेळी उपस्थित असलेल्या इतर वकील आणि लोकांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेबद्दल अद्याप कोणतीही औपचारिक तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
'द इंडियन एक्सप्रेस'शी बोलताना राकेश किशोर म्हणाले, "एक तरुण वकीलाने माझ्यावर चपलेने हल्ला केला. त्यानंतर आम्ही तेथून निघालो. त्यांनी असेही सांगितले की, आम्ही सरन्यायाधीशांवर बूट फेकल्याबद्दल आम्हाला शिक्षा करत आहोत. त्यानंतर आम्ही 'सनातन'च्या घोषणाही दिल्या. या प्रकरणी तक्रार दाखल केली नाही. वकिलांविरुद्ध तक्रार करून काय उपयोग? ते सर्व आमचेच बंधू आहेत. हे कुटुंबातील एक किरकोळ प्रकरण आहे."डश७६
सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशावर बूटफेकीची घटना ६ ऑक्टोबर २०२५ रोजी घडली होती. ७१ वर्षीय किशोर याला ताब्यात घेण्यात आले होते, परंतु सरन्यायाधीशांनी कोर्टाच्या रजिस्ट्रार जनरलना त्यांच्यावर खटला न भरण्याचे निर्देश दिल्यानंतर राकेश किशोरला त्याच दिवशी सोडण्यात आले होते.