Donald Trump Iran warning | 'आज रात्री एक संपूर्ण संस्कृती कायमची नष्ट होईल': इराणला ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा

Donald Trump Iran warning ४८ तासांच्‍या अल्‍टिमेटमकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले
Donald Trump Iran warning
प्रातिनिधिक छायाचित्र.Pudhari Photo.
Published on
Updated on

Donald Trump Iran warning

वॉशिंग्टन : "परिस्थिती न सुधारल्यास इराणची संस्कृती आज रात्रीपर्यंत नष्ट होऊ शकते, असा खळबळजनक दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. दरम्‍यान, ट्रम्प यांच्या युद्‍धपिसासू धोरणाने जागतिक वर्तुळात गोंधळाचे वातावरण निर्माण केले आहे. कठोर शब्दांतील इशारे आणि वारंवार मुदतवाढ यामुळे अमेरिकेची नेमकी रणनीती काय, याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत.

आजची रात्र जागतिक इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा क्षण

'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली भूमिका मांडताना ट्रम्प म्हणाले की, "आज रात्री एक संपूर्ण संस्कृती कायमची नष्ट होईल, जी पुन्हा कधीही उभी राहू शकणार नाही. मला असे घडावे असे वाटत नाही, पण बहुधा ते घडेलच." ट्रम्प यांनी हा इशारा देतानाच, परिस्थितीनुसार शेवटच्या क्षणी हल्ला रद्द होऊ शकतो, असे संकेतही दिले. त्यांनी आजच्या रात्रीला "जागतिक इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा क्षण" असे संबोधले आहे.

Donald Trump Iran warning
Donald Trump Iran threat | "...नाहीतर तुम्ही नरकात जगाल" : अर्वाच्य भाषेचा वापर करत ट्रम्‍प यांनी दिली इराणला धमकी
Pudhari

४७ वर्षांचा भ्रष्टाचार आणि मृत्यूचा खेळ आता संपेल

"आता आपल्याकडे पूर्ण आणि संपूर्ण सत्तापालट झाला आहे. जिथे अधिक हुशार आणि कमी कट्टर विचारसरणीची माणसे सत्तेत आहेत, तिथे कदाचित काहीतरी क्रांतिकारी घडू शकेल. कोणास ठाऊक? आज रात्री आपल्याला ते समजेलच. ४७ वर्षांचा भ्रष्टाचार आणि मृत्यूचा खेळ आता संपेल. इराणच्या महान जनतेवर देवाचे आशीर्वाद असोत!", असेही ट्रम्‍प यांनी आपल्‍या पोस्‍टमध्‍ये नमूद केले आहे.

Donald Trump Iran warning
Hormuz Open Iran Reaction: आमच्याकडून हार्मुझची 'किल्ली'च हरवली... शिवराळ डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीची इराणनं हवाच काढली

हॉर्मुझ सामुद्रधुनीवरुन वारंवार अल्‍टिमेटम

ट्रम्प यांनी इराणला हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ८ एप्रिल (EST वेळेनुसार आज रात्री ८ वाजेपर्यंत) ही अंतिम मुदत दिली आहे. या सामुद्रधुनीतून इंधन पुरवठा रोखल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. भारताच्या वेळेनुसार ही मुदत बुधवारी पहाटे संपणार आहे. सुरुवातीला ट्रम्प यांनी इराणला हा जलमार्ग मोकळा करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र, त्यानंतर ही मुदत अनेकदा वाढवण्यात आली आहे. ४८ तासांचा हा मूळ अल्टिमेटम आता ४०८ तासांच्या कालावधीपर्यंत लांबला आहे. याआधी मार्चच्या अखेरीस १० दिवसांची मुदत वाढ देण्यात आली होती, जी सोमवारी संपणार होती, परंतु तणाव कायम असल्याने ती पुन्हा एकदा वाढवण्यात आली.

Donald Trump Iran warning
Israel Iran Conflict |डोनाल्‍ड ट्रम्प यांच्‍या धमकीनंतर, इस्रायलचा इराणच्या प्रमुख पेट्रोकेमिकल प्रकल्पावर हल्ला

ट्रम्‍प यांच्‍या रणनीतीबाबत तर्कवितर्क

ट्रम्प यांच्या या धोरणाने जागतिक वर्तुळात गोंधळाचे वातावरण निर्माण केले आहे. कठोर शब्दांतील इशारे आणि वारंवार मुदतवाढ यामुळे अमेरिकेची नेमकी रणनीती काय, याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. निरीक्षकांच्या मते, जरी ट्रम्प यांची भाषा आक्रमक असली, तरी वारंवार दिली जाणारी मुदतवाढ पडद्याआड सुरू असलेल्या एखाद्या गुंतागुंतीच्या मुत्सद्दी प्रयत्नांचे संकेत देत आहे. ७ एप्रिलची अंतिम मुदत जवळ आल्याने जगाचे लक्ष आता इराणच्या भूमिकेकडे लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news