Donald Trump Iran threat | "...नाहीतर तुम्ही नरकात जगाल" : अर्वाच्य भाषेचा वापर करत ट्रम्‍प यांनी दिली इराणला धमकी

Donald Trump Iran threat |सोशल मीडियावरील पोस्‍टमध्‍ये शिवराळ भाषेचा वापर
Donald Trump Iran threat | "...नाहीतर तुम्ही नरकात जगाल" : अर्वाच्य भाषेचा वापर करत ट्रम्‍प यांनी दिली इराणला धमकी
Published on
Updated on

Donald Trump Iran threat

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी (५ एप्रिल) इराणविरुद्ध अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. इराणच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर अभूतपूर्व हल्ले करण्याची धमकी देतानाच, येणारा मंगळवार इराणसाठी "पॉवर प्लांट आणि पुलांच्या विद्ध्वंसाचा दिवस असेल" असे ट्रम्प यांनी जाहीर केले आहे.

Pudhari

अत्यंत अर्वाच्य आणि प्रक्षोभक भाषेचा वापर

आपल्या 'ट्रुथ सोशल' (Truth Social) पोस्टमध्ये ट्रम्प यांनी अत्यंत अर्वाच्य आणि प्रक्षोभक भाषेचा वापर करत म्हटले की, "ती होर्मुझची) सामुद्रधुनी उघडा, मूर्ख लोकांनो! नाहीतर तुम्ही नरकात जगाल – फक्त पाहत राहा!

Donald Trump Iran threat | "...नाहीतर तुम्ही नरकात जगाल" : अर्वाच्य भाषेचा वापर करत ट्रम्‍प यांनी दिली इराणला धमकी
Iran-US Israel war : ट्रम्प यांच्यासमोर वाढते आव्हान, अमेरिकेला मोठा आर्थिक फटका

अध्यक्षीय शिष्टाचारांना हरताळ?

इराणला दिलेल्या या संदेशात ट्रम्प यांनी शिवराळ भाषेचा वापर केला आहे. विशेष म्हणजे, एका अमेरिकन राष्ट्राध्यक्षाकडून आणि सैन्यदलाच्या सरसेनापतीकडून अपेक्षित असलेल्या शिष्टाचाराला सोडून ट्रम्प यांनी हे विधान केले आहे. अमेरिका आणि इराण मधील तणाव गेल्या काही आठवड्यांपासून शिगेला पोहोचला आहे. जगातील कच्च्या तेलाचा मोठा पुरवठा ज्या मार्गावरून होतो, ती 'होर्मुझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) खुली करण्यासाठी ट्रम्प सातत्याने दबाव टाकत आहेत.

Donald Trump Iran threat | "...नाहीतर तुम्ही नरकात जगाल" : अर्वाच्य भाषेचा वापर करत ट्रम्‍प यांनी दिली इराणला धमकी
US Iran conflict | अमेरिकेचा मोठा प्लॅन? इराणमध्ये ग्राउंड ऑपरेशनची तयारी, 'होर्मुझ'सह खार्ग बेटावरही डोळा

शनिवारी दिला होता ४८ तासांचा अल्टिमेटम

शनिवारी इराणच्या अणुकेंद्रानजीक झालेला हल्ला आणि अमेरिकेचे एक विमान पाडल्याच्या वृत्तानंतर ट्रम्प यांनी आपला अल्टिमेटम पुन्हा एकदा स्पष्ट केला. त्यांनी इराणला चर्चेसाठी १० दिवसांची मुदत दिली होती, ज्याची वेळ आता संपत आली आहे.ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते, "लक्षात ठेवा, मी इराणला डील करण्यासाठी किंवा होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यासाठी १० दिवसांचा वेळ दिला होता. आता वेळ संपत चालली आहे. इराणवर संकट कोसळण्यापूर्वी आता फक्त ४८ तास शिल्लक आहेत. देवाचा विजय असो! - राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प."

Donald Trump Iran threat | "...नाहीतर तुम्ही नरकात जगाल" : अर्वाच्य भाषेचा वापर करत ट्रम्‍प यांनी दिली इराणला धमकी
Donald Trump Iran warning |"इस्रायलचे हल्ले आता थांबणार, पण..."; कतारवरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा इराणला इशारा

मंगळवारी होणार मोठा हल्ला?

ट्रम्प यांनी आपल्या खास शैलीत इराणला इशारा दिला असून, इराणमधील वीज प्रकल्प (Power Plants) आणि पुलांवर समन्वित हल्ले करण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी म्हटले की, "मंगळवार हा 'पॉवर प्लांट डे' आणि 'ब्रिज डे' असेल. असे काही यापूर्वी कधीही घडले नसेल!" एकीकडे ट्रम्प यांनी ४८ तासांची मुदत दिली असतानाच, इराणने मात्र मागे हटण्याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत. रविवारी इराणने कुवेत, संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि बहरीनमधील ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले केल्याचे वृत्त आहे.

Donald Trump Iran threat | "...नाहीतर तुम्ही नरकात जगाल" : अर्वाच्य भाषेचा वापर करत ट्रम्‍प यांनी दिली इराणला धमकी
Strait of Hormuz Tensions | 'होर्मुझ'मध्ये युद्धनौका तैनातीबाबत अमेरिकेशी कोणतीही चर्चा नाही; भारताची स्‍पष्‍टोक्‍ती

अमेरिकन वैमानिकाची सुटका

डोनाल्‍ड ट्रम्‍प यांच्‍या स्फोटक पोस्ट सोशल मीडियावर पोस्‍ट करण्‍याच्‍या काही तास आधी ट्रम्प यांनी एका धाडसी मोहिमेची माहिती दिली. अमेरिकन सैन्याने इराणच्या हद्दीत शिरून एका जखमी F-15 वैमानिकाला सुखरूप बाहेर काढल्याचा दावा त्यांनी केला आहे. ही मोहीम अत्यंत धोकादायक होती आणि अमेरिकन सैन्याने इराणच्या रडार यंत्रणेला चकवा देऊन ही कामगिरी फत्ते केल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. या कारवाईत हवाई दलाचा अधिकारी गंभीर जखमी झाल्याची पुष्टीही त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news