Trump vs Pope |इराण युद्धावरून आता ट्रम्प आणि पोप आमने-सामने! अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सोशल मीडिया पोस्टने खळबळ!

Trump vs Pope controversy |इराण युद्धाची ठिणगी आता व्हॅटिकन सिटीपर्यंत? ट्रम्प यांनी केलेल्या सोशल मीडिया पोस्टने खळबळ!
प्रातिनिधिक छायाचित्र.
प्रातिनिधिक छायाचित्र.Trump vs Pope controversy
Published on
Updated on

Trump vs Pope controversy

वॉशिंग्टन/व्हॅटिकन सिटी : अमेरिका आणि इराणमधील युद्धविरामाची चर्चा फिस्कटल्यानंतर पुन्हा एकदा संपूर्ण जगातील तणाव वाढला आहे. अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण युद्धाचे वर्णन 'ईश्वरी संमती लाभलेले' असे केले; परंतु पोप यांनी मात्र 'ईश्वर कोणत्याही संघर्षाला आशीर्वाद देत नाही,' असा ठाम पवित्रा घेतला. यानंतर आता ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पोप यांनाच प्रत्युत्तर दिल्‍याचे मानले जात आहे. यामुळे राष्ट्राध्यक्षांची सत्ता आणि पोप यांचा नैतिक अधिकार यांच्यात एक संघर्ष निर्माण झाला आहे.

इराण युद्ध म्हणजे 'दैवी' मोहीम : ट्रम्प

ट्रम्प यांच्या मते, इराण युद्धासाठी देवाने त्यांची निवड केली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले होते की, "माझा असा विश्वास आहे की इराणविरुद्धच्या युद्धात देव अमेरिकेच्या बाजूने आहे." यानंतर त्यांनी 'ट्रुथ सोशल'वर पोपची खिल्ली उडवली. इतकेच नाही तर, पोपला इराणकडे अण्वस्त्रे असावीत असे वाटते, असा दावाही ट्रम्प यांनी केला.

प्रातिनिधिक छायाचित्र.
Us Iran Deal: औटघटिकेचा युद्धविराम!

काय म्हणाले होते पोप?

ख्रिश्चन धर्मातील (रोमन कॅथोलिक चर्चचे) सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी म्हटले होते की, "रक्ताने माखलेल्या हातांनी केलेली प्रार्थना देव ऐकत नाही." तसेच ट्रम्प यांनी त्यांना एक कमकुवत नेता आणि अति-उदारमतवादी व्यक्ती असेही म्हटले होते. तसेच ट्रम्प यांनी पोपला इराणकडे अण्वस्त्रे असावीत असे वाटते, हे आरोपही व्हॅटिकन आणि पोप यांनी फेटाळून लावले आहेत. पोप यांचा युद्धाला सातत्याने तीव्र विरोध आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेला देण्यात आलेल्या धमक्यांना त्यांनी पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचे म्हटले आहे. 'पाम संडे'च्या प्रवचनात त्यांनी स्पष्ट केले की, "जे युद्ध करतात त्यांच्या प्रार्थना देव ऐकत नाही, तर त्या फेटाळून लावतो."

प्रातिनिधिक छायाचित्र.
Donald Trump Iran threat | "...नाहीतर तुम्ही नरकात जगाल" : अर्वाच्य भाषेचा वापर करत ट्रम्‍प यांनी दिली इराणला धमकी

पोप यांनी केले होते शस्त्रे खाली ठेवण्याचे आवाहन

पोप यांनी त्यांच्या ईस्टर संदेशात शस्त्रे खाली ठेवण्याचे आवाहन केले होते. इराणी सभ्यता नष्ट करण्याची ट्रम्प यांनी धमकी दिल्यानंतर त्यांनी हे आवाहन केले होते. व्हॅटिकनचे अमेरिकेतील प्रतिनिधी कार्डिनल क्रिस्टोफ पियरे यांना पेंटागॉनमध्ये पाचारण करण्यात आले. एका रिपोर्टनुसार, संरक्षण उपसचिव एलब्रिज कोल्बी यांनी कार्डिनलना सांगितले की, "अमेरिकेकडे लष्करी ताकद आहे आणि कॅथोलिक चर्चने अमेरिकेचीच बाजू घेतलेली बरी."

प्रातिनिधिक छायाचित्र.
Hormuz Open Iran Reaction: आमच्याकडून हार्मुझची 'किल्ली'च हरवली... शिवराळ डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीची इराणनं हवाच काढली

ट्रम्प यांनी नेमकी कोणती पोस्ट केली?

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथवर आपल्या खास शैलीत तथ्य आणि कल्पित कथांची सरमिसळ केली. 'ट्रुथ सोशल'वरील पोस्‍टमध्‍ये एका एआय-जनरेटेड फोटोत राष्ट्रपती ट्रम्प बायबलमधील संतासारखे झगे घालून एका आजारी माणसाला आशीर्वाद देताना दिसत आहेत. पोप लिओ चौदावे आणि कॅथोलिक चर्चला त्यांनी दिलेले प्रत्युत्तर मानले जात आहे. इराण युद्धावरून पोप यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना प्रश्न विचारण्याचे धाडस केले होते. त्याला ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत प्रत्युत्तर दिले असल्‍याचे मानले जात आहे.

Pudhari

ख्रिस्ताचा अनुयायी बॉम्ब टाकणाऱ्यांच्या बाजूने कधीही उभा राहणार नाही

१० एप्रिल रोजी पोप यांनी 'X' वर स्पष्ट संदेश दिला की, "जो कोणी ख्रिस्ताचा अनुयायी आहे, तो बॉम्ब टाकणाऱ्यांच्या बाजूने कधीही उभा राहणार नाही." दोन्ही बाजूंनी तणाव निवळण्याचे प्रयत्न झाले असले तरी, ट्रम्प यांच्या ताज्या पोस्टने मूळ वाद पुन्हा समोर आणला आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र.
DONALD TRUMP |युद्धात मदतीस नकार अन् ट्रम्प यांचा वार..! थेट फ्रान्सच्या फर्स्ट लेडींचे 'घरगुती' भांडणच आणले चव्हाट्यावर

अमेरिकेतील निवडणुका आणि धर्म

२०२४ च्या निवडणुकीत ट्रम्प यांना ५५ टक्के कॅथोलिक मते मिळाली होती. आता इराण युद्ध आणि वाढत्या इंधनाच्या किमतींमुळे ट्रम्प प्रशासन दबावाखाली आहे. नोव्हेंबरच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी रिपब्लिकन पक्षाला या कॅथोलिक मतांची नितांत गरज आहे. या निवडणुकीत पराभव झाला, तर ट्रम्प यांची सत्ता धोक्यात येईल आणि २०२८ मध्ये डेमोक्रॅट्सच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळेच, इराणमधील युद्धाला 'धर्मयुद्ध' ठरवून ट्रम्प आपले राजकीय अस्तित्व वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे पोप 'युद्धात देवाचा आशीर्वाद नाही' यावर ठाम आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news