Trump Strait Hormuz Iran Proposal: 'ट्रम्प स्ट्रेट' US च्या राष्ट्राध्यक्षांना हवं आहे होर्मुझ; इराणचा 'तो' प्रस्ताव धुडकावला

इराणचा सात दिवसात होर्मुझ ओपन करण्याचा प्रस्ताव अमेरिकेने नाकारला असून ट्रम्प यांनी थेट स्ट्रेट ऑफ होर्मुझवरच दावा ठोकला आहे.
Trump Strait Hormuz Iran Proposal
Trump Strait Hormuz Iran Proposalpudhari
Published on: 
Updated on: 

Trump Strait Hormuz Iran Proposal: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी आपल्या ट्रुथ सोशल मीडियावर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचा नकाशा पोस्ट केला. त्याला त्यांनी ट्रम्प स्ट्रेट असं संबोधित केलं. त्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणाचा स्ट्रेट ऑफ होर्मुझ सात दिवसात खुलं करण्याची प्रक्रिया आणि न्युक्लिअर प्रोग्रामबाबत वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव धुडाकवून लावला. त्यानंतर त्यांनी ही पोस्ट केली होती.

वॉशिंग्ट पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार ट्रम्प यांनी इराणने कधीही न्युक्लिअर बॉम्ब तयार करू नये या मागणीवर ठाम आहेत. इराण प्रशासनाने त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात नाहीतर तुमच्यावर नव्याने बॉम्ब वर्षाव करण्यात येणार अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे.

Trump Strait Hormuz Iran Proposal
US-Iran Tension | युद्धाचा वणवा पुन्हा पेटणार? शांतता कराराच्या चर्चेत अडथळा

इराणचा काय होता प्रस्ताव?

इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी यापूर्वी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधील जहाजांचे ट्रॅफिक सात दिवसात पूर्ववत केलं जाऊ शकतं. फक्त अमेरिकेने इराणच्या अटी मान्य कराव्यात असं सांगितलं होत.

इराणने दिलेल्या प्रस्तावात अमेरिकेने इराणच्या बंदरावर निर्माण केलेली नौदलाची नाकाबंधी उठवावी, इराणच्या तेल विक्रीवर लावलेले निर्बंध उठवावेत आणि करण्यात येणाऱ्या शस्त्रसंधीत लेबनानचा देखील समावेश करण्यात यावा.

Trump Strait Hormuz Iran Proposal
Iran US war: इराण-अमेरिका चर्चेची तयारी: तेहरानने ठेवल्या ७ कडक अटी; ट्रम्प यांच्या धमक्यांचा काहीही परिणाम होणार नाही

तर सात दिवसात होर्मुझ

अराघची म्हणाले होते की, 'जर तुम्ही या सर्व अटी मान्य केल्या तर स्ट्रेट ऑफ होर्मुझ पुन्हा खुलं होऊ शकतं. सामान्य स्थितीला येऊ शकतं. यासाठी सात दिवसांचा अवधी पुरेसा आहे. आता अमेरिकेला निर्णय घ्यायचा आहे.'

ते पुढे म्हणाले की, 'जर अमेरिकेने आमच्या मागण्या आणि प्रस्ताव मान्य केला तर सात दिवसांची टाईम लाईन लवकरात लवकर सुरू होईल.'

Trump Strait Hormuz Iran Proposal
US Iran war cost : इराणला नष्ट करायला गेले अन् स्वतःच अडकले; युद्धात अमेरिकेने केला तब्बल ३.२० लाख कोटींचा चुराडा!

अमेरिकेने प्रस्ताव नाकारला?

मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या सोशल मीडिया पोस्टवरून अमेरिकेला इराणचा हा प्रस्ताव मान्य नाही असं दिसतंय. तसेच वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार अमेरिकेने इराणचा हा प्रस्ताव नाकारला आहे.

ट्रम्प यांचा होर्मुझवर अमेरिकेचे पूर्ण नियंत्रण हवे ही मागणी काही नवी नाहीये. ऑगस्ट महिन्यात त्यांनी स्ट्रेट ऑफ होर्मुझचा नकाशा टाकून ही अमेरिकेची नवीन टेरिटोरी असल्याचा दावा केला होता.

Trump Strait Hormuz Iran Proposal
US vs Iran | आमचा हल्ला भीषण असेल; इराणचा अमेरिकेला इशारा

डोनाल्ड ट्रम्प यांना हवं आहे होर्मुझ

डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ ही अमेरिकेची टेरिटोरी घोषित करणे ही एक चांगली कल्पना आहे असं वर्णन केलं होतं. त्यांनी अमेरिकेने नाकाबंदीद्वारे आधीच होर्मुझवर नियंत्रण मिळवलं असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

स्ट्रेट ऑफ होर्मुझ हे इराणसाठी अमेरिकेसोबतच्या वाटाघाटीसाठीचा मुख्य मुद्दा असल्याचं समोर आलं आहे. अमेरिका - इराण युद्धापूर्वी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हे पाचवा सर्वात मोठा जगाचे तेल आणि गॅस वाहतूक होणारा जलमार्ह होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news