ChatGPT Murder Case |पुरुषांसोबत डेटवर जायची, नंतर चॅटजीपीटीला विचारून गोळ्या द्यायची... दोघांच्या मृत्यूने खळबळ

दोन पुरुषाच्‍या खुनाचे गूढ उलगडले, 'चॅटजीपीटी'वरील चॅटिंग ठरले मुख्‍य पुरावा
ChatGPT Murder Case
प्रतीकात्मक छायाचित्र.AI-generated image
Published on
Updated on

ChatGPT Murder Case

सोल ( दक्षिण कोरिया) : “झोपेच्या गोळ्या आणि दारू एकत्र घेतल्यास काय होते?”“त्यांचे एकत्र सेवन केल्यास किती प्रमाण धोकादायक ठरू शकते?” “तुमचा मृत्यू होऊ शकतो का?”... हे प्रश्‍न तिने 'चॅटजीपीटी'(ChatGPT) ला विचारले. यानंतर तिने तिघांना हे औषध दिलं. त्‍यापैकी दोघांचा मृत्‍यू झाला. तर एक जण थोडक्‍यात बचावला. दक्षिण कोरियामध्ये खळबळजनक खुनाच्या प्रकरणात चॅटजीपीटी (ChatGPT) वरील संभाषण हा मुख्य पुरावा ठरला आहे.

चॅटजीपीटीवरील संभाषणांचे फॉरेन्सिक पुरावे मिळाले

आरोपी महिलेने मात्र न्यायालयात असा दावा केला होता की, दोन पुरुषांचा मृत्यू अपघाती होते. त्‍यांना जीवे मारण्‍याचा तिचा हेतू नव्हता. परंतु, चॅटजीपीटीवरील तिचे सर्च रेकॉर्ड्सने तिचा दावा खोटा ठरवला. दक्षिण कोरियाच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किम सो-यंग या महिलेने तीन पुरुषांना दारू आणि 'बेंझोडियाझेपिन' (Benzodiazepine) या औषधाचे मिश्रण दिले होते. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. या प्रकरणात किमचा 'खून करण्याचा हेतू' सिद्ध करण्यासाठी तपासकर्त्यांनी तिच्या फोनमधून चॅटजीपीटीवरील संभाषणांचे फॉरेन्सिक पुरावे मिळवले आहेत.

ChatGPT Murder Case
Forest fire prevention technology |जळताहेत पृथ्वीची फुफ्फुसे...

चॅटजीपीटी (ChatGPT) संभाषण पुरावा म्हणून स्वीकारण्‍यात आला

'एनबीसी' न्‍यूजने दिलेल्‍या वृत्तानुसार, गुन्हा करण्यापूर्वी किम सो-यंग हिने चॅटजीपीटीवर या औषधांच्या परिणामांबाबत काही प्रश्न विचारले होते. पीडितांच्या कुटुंबाचे वकील नाम इओन्हो यांनी सांगितले की, "हे प्रकरण केवळ पुराव्यापुरते मर्यादित नाही, तर खुनाच्या खटल्यात चॅटजीपीटीवरील संभाषण थेट पुरावा म्हणून स्वीकारले जाणे ही एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी घटना आहे. हा पुरावा ग्राह्य धरला गेला नाही, तर आरोपीचा 'मारण्याचा हेतू' सिद्ध करणे कठीण झाले असते."

ChatGPT Murder Case
Digital Arrest Scam : सावधान! 'डिजिटल अरेस्ट'साठी वापरलेली ९,४०० व्हॉट्सॲप खाती बॅन; कंबोडियातून चालत होतं रॅकेट

जगभरात गुन्हेगारीत AI चा वाढता वापर

दक्षिण कोरियातील अशा प्रकारचे पहिलेच प्रकरण असल्‍याचे मानले जात आहे. मात्र . जगभरात अशा अनेक घटना समोर येत आहेत जिथे गंभीर गुन्ह्यांसाठी 'एआय' (AI) प्रोग्राम्सची मदत घेतली जात आहे. फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीमधील गोळीबाराच्या घटनेत आरोपी चॅटजीपीटीच्या सतत संपर्कात असल्याचे समोर आले. चॅटजीपीटीने त्याला 'कोणती बंदूक वापरावी' आणि 'कोणत्या अंतरावरून गोळीबार करावा' याबद्दल माहिती दिल्याचे तपासात आढळले आहे. कॅनडामध्‍येही एका गोळीबाराच्या घटनेत आरोपीने आधीच एआय प्लॅटफॉर्मवर हिंसक घटनांची चर्चा केली होती, मात्र एआय कंपनीने त्याबद्दल पोलिसांना वेळेवर माहिती दिली नाही, असा आरोप होत आहे. लास वेगासमध्ये स्फोटकांबाबत माहिती मिळवण्यासाठी आणि उत्तर कॅरोलिनामध्ये पतीला विष देण्यासाठी घातक औषधांच्या मिश्रणाचा शोध घेण्यासाठी गुन्हेगारांनी एआयचा वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे.

ChatGPT Murder Case
Nagpur News: अति सुखाचा हव्‍यास.. लग्‍नाआधी थेट मृत्‍यूशी 'गाठ'! भावी पत्नीला भेटण्यापूर्वी 'ते' औषध तरुणाच्या जीवावर बेतले

AI कंपन्‍यांच्‍या भूमिकेवर नैतिक प्रश्न आणि जबाबदारीही वाढली

या घटनांमुळे एआय (AI) विकसित करणाऱ्या कंपन्यांवर दबाव वाढत आहे. या प्रकरणी एमआयटी (MIT) मधील तज्ज्ञ मॅक्स टेगमार्क यांनी म्‍हटलं आहे, सँडविच बनवण्यासाठी जितकी सुरक्षा मानके आहेत, त्यापेक्षा कमी मानके सध्या एआय प्रणालींसाठी आहेत. जोपर्यंत या कंपन्या गुन्हेगारी कृत्यांसाठी माहिती देण्यास नकार देत नाहीत, तोपर्यंत असे धोके कायम राहतील."

ChatGPT Murder Case
Shocking Incident | "४ गर्लफ्रेंड्स आणि १२ पानांचे 'ते' पत्र.." : सॉफ्टवेअर इंजिनिअरच्‍या भावी पत्‍नीने जीवन का संपवले ?

'गुन्हेगारांना AIशी संवाद साधताना अपराधीपणाची भावना जाणवत नाही'

वकील नाम इओन्हो यांनी स्‍पष्‍ट केले की, एआयशी संवाद साधताना गुन्हेगारांना अपराधीपणाची भावना जाणवत नाही. एखाद्या व्यक्तीने मानवाला विषाच्या डोसबद्दल विचारले असते, तर त्या माणसाने नक्कीच प्रश्न विचारले असते. पण चॅटजीपीटी कोणतीही नैतिक चाळणी न लावता उत्तरे देते," असे त्यांनी स्पष्ट केले.

ChatGPT Murder Case
crime news |भयंकर... 'वेस्टर्न स्टाईल' प्रपोज करण्याच्या बहाण्याने प्रियकराला खुर्चीला बांधले आणि जिवंत जाळले!

अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरक्षा यंत्रणांसमोर नवीन आव्हाने

एआय तंत्रज्ञानाचा वापर करून केलेले गुन्हे आता कायदा आणि सुरक्षा यंत्रणांसमोर नवीन आव्हाने उभी करत आहेत. वाहनांसाठी 'सीट बेल्ट' किंवा सोशल मीडियासाठी 'मॉडरेशन' आले, त्याचप्रमाणे एआयसाठी कठोर सुरक्षा नियम बनवण्याची वेळ आता आली आहे. दक्षिण कोरियातील या खटल्याची पुढील सुनावणी जूनमध्ये होणार असून, न्यायालय चॅटजीपीटीच्या पुराव्याला किती महत्त्व देते याकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news