Nagpur News: अति सुखाचा हव्‍यास.. लग्‍नाआधी थेट मृत्‍यूशी 'गाठ'! भावी पत्नीला भेटण्यापूर्वी 'ते' औषध तरुणाच्या जीवावर बेतले

overdose of power tablets | नागपूरमधील तरुणाचा हरियाणातील गुरुग्राममध्‍ये मृत्‍यू
cardiac arrest self medication
प्रातिनिधिक छायाचित्र. Pudhari
Published on
Updated on

cardiac arrest self medication

गुरुग्राम: लैंगिक सुख ही मानवी जीवनातील एक नैसर्गिक ओढ मात्र त्याबद्दलच्या 'भ्रामक' कल्पना सध्याच्या तरुण पिढीसाठी जीवघेण्या ठरत आहेत. लग्नापूर्वी एका तरुणाने वैद्यकीय सल्ल्याशिवाय 'लैंगिक क्षमता' वाढवणाऱ्या उत्तेजक गोळ्यांचे सेवन केले. मात्र, सुखाचा हा अतिहव्यास थेट मृत्यूच्या दारापर्यंत घेऊन गेला. डोसचा अतिरेक झाल्याने या तरुणाला आपले प्राण गमवावे लागले असल्‍याचे प्रथामिक तपासात समोर आले आहे. ही खळबळजनक घटना हरियाणाच्या गुरुग्राममध्‍ये घडली आहे.

तरुणाचा झाला होता नुकताच साखरपुडा

'नवभारत टाइम्‍स'ने दिलेल्‍या वृत्तानुसार, रोहित लाल (वय २९) मूळचा नागपूरचा होता. तो नवी दिल्लीतील 'क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया'च्या कार्यालयात कार्यरत होता आणि गुरुग्राममध्ये भाड्याने राहत होता. त्‍याचा नुकताच साखरपुडा झाला होता. तो त्याच्या भावी पत्नीच्या आगमनाची वाट पाहत होता.

cardiac arrest self medication
custodial death case | सत्यमेव जयते! महिला कॉन्‍स्‍टेबलचे धाडस...कोठडीतील हत्या प्रकरणी ९ पोलिसांना फाशीची शिक्षा कशी झाली?

दरवाजा तोडला तेव्हा...

रोहित त्याचे सहकारी रोज एकत्र ऑफिसला जात असत. गुरुवारी (दि.२३) सकाळी ८ वाजेपासून सहकारी त्याला फोन करत होते, मात्र त्याने फोन उचलला नाही. त्‍यामुळे सहकारी त्याच्या फ्लॅटवर पोहोचले, तेव्हा आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. सकाळी १०:०५ च्या सुमारास सहकाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत फ्लॅटचा दरवाजा तोडला. रोहित बेडवर मृतावस्थेत आढळला. दरवाजा आतून बंद होता आणि घरात जबरदस्तीने प्रवेश केल्याचा कोणताही निशाणा नव्हता.

cardiac arrest self medication
mumbai concert tragedy: लाईव्ह कॉन्सर्टमध्ये ड्रग्जचा ओव्हरडोस; दोघांचा मृत्यू

उत्तेजक औषधांच्‍या अतिसेवनामुळे मृत्यूचा संशय

तपासादरम्यान पोलिसांना खोलीत काही उत्तेजक औषधे आणि हेल्थ सप्लीमेंट्स आढळली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहितने आपल्या होणाऱ्या पत्नीला भेटायला बोलावले होते. तिला भेटण्यापूर्वी त्याने लैंगिक क्षमता वाढवणारी औषधे घेतली असावीत, याचा ओव्हरडोज झाल्याने त्याला हृदयविकाराचा झटका आला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.

cardiac arrest self medication
Crime News: लग्नात ओळख, भेटायला बोलावून अत्याचार आणि अश्लील व्हिडिओ; नराधम इंजिनिअरचे कृत्य सांगताना MBAची विद्यार्थिनी रडली

औषधाच्‍या अतिसेवनाने अचानक रक्‍तदाब वाढल्‍याची शक्‍यता

औषधांच्या अतिसेवनामुळे रक्तदाब अचानक वाढल्याने ही दुर्घटना घडली असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.सेक्टर ५३ चे एसएचओ (SHO) सतेंद्र रावल यांनी सांगितले की, "आम्ही मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. विसेरा आणि घटनास्थळी सापडलेली औषधे तपासणीसाठी एफएसएलकडे (FSL) पाठवण्यात आली आहेत. मृत्यूचे नेमके कारण विसेरा रिपोर्ट आल्यानंतरच स्पष्ट होईल.सध्या या प्रकरणी 'भारतीय नागरिक सुरक्षा संहिता' कलम १९४ अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news