Epstein Files | ब्रिटीश राजघराण्याला मोठा धक्का; एपस्टाईन प्रकरणी किंग चार्ल्स यांच्या भावाला अटक

Epstein Files Prince Andrew arrest | सार्वजनिक पदावर असताना गैरवर्तन केल्‍याच्‍या संशयावरुन प्रिन्स अँड्र्यू यांच्‍यावर कारवाई
Epstein Files | ब्रिटीश राजघराण्याला मोठा धक्का; एपस्टाईन प्रकरणी किंग चार्ल्स यांच्या भावाला अटक
Published on
Updated on

Epstein Files Prince Andrew arrest

लंडन : अमेरिकेतील कुप्रसिद्ध लैंगिक गुन्हेगार जेफरी एपस्टाईन याच्याशी असलेल्या संबंधांच्या प्रकरणात ब्रिटनमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी किंग चार्ल्स यांचे धाकटे भाऊ प्रिन्स अँड्र्यू यांना अटक केली आहे. 'बीबीसी'ने दिलेल्या वृत्तानुसार, सार्वजनिक पदावर असताना गैरवर्तन केल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्‍यात आली आहे.

Pudhari

सँड्रिंघम इस्टेटवर पोलिसांचा छापा

पूर्व इंग्लंडमधील सँड्रिंघम इस्टेट येथील 'वुड फार्म'वर सहा विना-नंबरच्या पोलीस वाहने आणि सुमारे आठ साध्या वेशातील पोलीस अधिकारी पोहोचल्याचे वृत्त स्थानिक वृत्तपत्रांनी दिले होते. अमेरिकन सरकारने अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या कागदपत्रांनुसार, माउंटबॅटन-विंडसर यांनी लैंगिक गुन्हेगाराला (एपस्टाईन) सरकारी गोपनीय कागदपत्रे सोपवल्याचा आरोप आहे. थेम्स व्हॅली पोलीस या आरोपांची गांभीर्याने चौकशी करत आहेत.

Epstein Files | ब्रिटीश राजघराण्याला मोठा धक्का; एपस्टाईन प्रकरणी किंग चार्ल्स यांच्या भावाला अटक
Epstein Files मध्ये या बड्या भारतीय सेलिब्रेटींची नावे, वाचून धक्का बसेल!

एपस्टाईनशी असलेल्‍या मैत्रीबद्दल पश्चात्ताप, आरोप फेटाळले

दिवंगत महाराणी एलिझाबेथ यांचे दुसरे पुत्र असलेल्या माउंटबॅटन-विंडसर यांनी एपस्टाईन प्रकरणातील सर्व आरोप नेहमीच फेटाळले आहेत. एपस्टाईनशी असलेल्या मैत्रीबद्दल त्यांनी यापूर्वी पश्चात्ताप व्यक्त केला होता. मात्र, नवीन कागदपत्रे समोर आल्यानंतर त्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.थेम्स व्हॅली पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात थेट नाव न घेता म्हटले आहे की, "सार्वजनिक पदाचा गैरवापर केल्याच्या संशयावरून ६० वर्षांहून अधिक वयाच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. सध्या बर्कशायर आणि नॉरफॉक येथील ठिकाणांची झडती घेतली जात आहे."

Epstein Files | ब्रिटीश राजघराण्याला मोठा धक्का; एपस्टाईन प्रकरणी किंग चार्ल्स यांच्या भावाला अटक
Epstein files: धक्कादायक! रशियन मुलींशी शरीरसंबंधानंतर झालेला लैंगिक आजार बिल गेट्स यांनी पत्नीपासून लपवला?

'तपासात निष्पक्षता आणि अखंडता राखणे महत्त्वाचे'

वरिष्‍ठ पोलीस अधिकारी ऑलिव्हिर राइट यांनी माहिती दिली की, "सखोल मूल्यमापन केल्यानंतर आम्ही आता सार्वजनिक पदावरील गैरवर्तनाच्या आरोपाची चौकशी सुरू केली आहे. या तपासाची निष्पक्षता आणि अखंडता राखणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. या प्रकरणातील जनहित लक्षात घेता, आम्ही योग्य वेळी पुढील माहिती देऊ."

Epstein Files | ब्रिटीश राजघराण्याला मोठा धक्का; एपस्टाईन प्रकरणी किंग चार्ल्स यांच्या भावाला अटक
Epstein files : ‘मी एपस्टीनला ३-४ वेळा भेटलो; मात्र आरोपांशी संबंध नाही’, राहुल गांधींच्या आरोपांवर हरदीपसिंह पुरींचे प्रत्युत्तर

एपस्टाईन याच्याशी असलेल्या संबंधांमुळे प्रिन्स अँड्र्यू वादात

'ड्यूक ऑफ यॉर्क' म्हणून ओळखले जाणारे प्रिन्स अँड्र्यू यांचे नाव अमेरिकन फायनान्सर जेफरी एपस्टाईन याच्याशी असलेल्या संबंधांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर वादात राहिले आहे. एपस्टाईनवर अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण आणि तस्करीचे गंभीर आरोप होते. २०१९ मध्ये त्याच्या अटकेनंतर प्रिन्स अँड्र्यू यांच्यासोबतचे त्याचे फोटो आणि जुने संबंध पुन्हा चर्चेत आले.

Epstein Files | ब्रिटीश राजघराण्याला मोठा धक्का; एपस्टाईन प्रकरणी किंग चार्ल्स यांच्या भावाला अटक
Donald Trump Epstein Files: ट्रम्प अन् एप्स्टिनने बलात्कार केला? महिलेचा डोक्यात गोळी लागून मृत्यू झाला; प्रकरणाचं पुढं काय झालं?

व्हर्जिनिया गिफ्रे यांचे गंभीर आरोप, २०२२मध्‍ये लष्‍करी पदव्‍या गमावल्‍या

या प्रकरणातील सर्वात मोठा वाद तेव्हा निर्माण झाला जेव्हा व्हर्जिनिया गिफ्रे यांनी आरोप केला की, अल्पवयीन असताना एपस्टाईनच्या नेटवर्कद्वारे त्यांना प्रिन्स अँड्र्यू यांच्याशी लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले गेले होते. अँड्र्यू यांनी हे आरोप फेटाळले होते, मात्र २०१९ मध्ये दिलेल्या एका वादग्रस्त टीव्ही मुलाखतीनंतर त्यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. जानेवारी २०२२ मध्ये महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी त्यांच्या लष्करी पदव्या आणि शाही संरक्षण काढून घेतले होते. नंतर त्यांनी गिफ्रे यांच्यासोबतचा दिवाणी खटला न्यायालयाबाहेर निकाली काढला. जरी त्यांनी कोणतीही गुन्हेगारी जबाबदारी स्वीकारली नाही, तरी या प्रकरणामुळे ब्रिटिश राजेशाहीच्या प्रतिमेवर आणि जबाबदारीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले होते

कायद्याने आपले काम केले पाहिजे : किंग चार्ल्स

"कायद्याने आपले काम केले पाहिजे, अशा शब्‍दांमध्‍ये भाऊ अँड्र्यूच्या अटकेवर किंग चार्ल्स यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news