

Epstein Files सध्या जगभर एपिस्टन फाईल्सने खळबळ उडवून दिली आहे. अनेक राजकारणी, शास्त्रज्ञ , बिझनेसमन यांची नावे समोर येत आहेत. अनेक लोकांची काळे कारनामे बाहेर पडत आहेत. लैंगिंक प्रकरणांमध्ये अशा बुध्दीजीवी, मोठ्या लोकांचे फोटो व्हिडीओ पाहून अनेकजण चक्रावले आहेत. आता यामध्ये फाईल्स मध्ये अनेक भारतीय मोठ्या लोकांची नावे उघड झाली आहेत. अमेरिकेच्या न्याय विभागाने नुकतीच या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे सार्वजनिक केली आहेत.
यादीतून या भारतीय लोकांची नावे आली समोर
अनिल अंबानी : प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांचे नाव या फाईल्समध्ये अनेकदा आले आहे. कागदपत्रांनुसार, २०१९ मध्ये न्यूयॉर्कमध्ये अंबानी आणि इपस्टीन यांच्यात संभाव्य भेटीबाबत चर्चा झाली होती. या ईमेल्समध्ये आर्थिक बाबी, अमेरिकेतील प्रभावशाली व्यक्तींची ओळख आणि भारतातील राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याचे दिसून येते. मात्र, यात कोणत्याही गुन्हेगारी कृत्याचा उल्लेख नाही.
दीपक चोप्रा : प्रसिद्ध लेखक आणि वेलनेस गुरू दीपक चोप्रा यांचे नाव इपस्टीनसोबतच्या ईमेल संवादात आले आहे. इपस्टीनला २००८ मध्ये शिक्षा झाल्यानंतरही हे दोघे संपर्कात होते. २०१८ पर्यंत त्यांच्यात कायदेशीर बाबी आणि काही सार्वजनिक व्यक्तींविषयी चर्चा झाल्याचे कागदपत्रे सांगतात.
मीरा नायर : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शिका मीरा नायर यांचे नाव २००९ मधील एका सामाजिक कार्यक्रमाच्या संदर्भात आले आहे. इपस्टीन हा एका कार्यक्रमाला उपस्थित होता, जिथे नायर 'होस्ट कमिटी'च्या सदस्य होत्या. त्यांचा इपस्टीनशी थेट संबंध असल्याचे कोणतेही पुरावे मात्र यामध्ये नाहीत.
अनुराग कश्यप : प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचे नाव एका ईमेल थ्रेडमध्ये आले आहे. शांघायमध्ये एका नियोजित बैठकीबाबत चर्चा सुरू असताना कश्यप यांचा उल्लेख "एक प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक" असा करण्यात आला होता. हा उल्लेख अत्यंत त्रोटक आणि एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमापुरता मर्यादित आहे.
नंदिता दास : अभिनेत्री आणि दिग्दर्शिका नंदिता दास यांचे नाव एका कार्यक्रमाच्या निमंत्रणाशी संबंधित आहे. इंग्लंडमधील 'लेक डिस्ट्रिक्ट फेस्टिव्हल'मध्ये नंदिता दास वक्त्या म्हणून उपस्थित होत्या आणि इपस्टीनलाही तिथे निमंत्रित करण्यात आले होते. ही केवळ एका कार्यक्रमातील उपस्थिती असल्याचे समजते.
कोण होता इपस्टिन
जेफ्री इपस्टीन हा एक श्रीमंत गुंतवणूकदार होता, ज्याच्यावर लैंगिक तस्करी आणि अल्पवयीन मुलींचे शोषण केल्याचे गंभीर आरोप होते. या फाईल्समध्ये कोर्टाचे दस्तऐवज, ईमेल्स, पीडितांचे जबाब आणि छायाचित्रांचा समावेश आहे. मात्र, या फाईल्समध्ये नाव असणे म्हणजे तो व्यक्ती गुन्हेगार आहे असे नाही; अनेकांची नावे केवळ सामाजिक कार्यक्रम किंवा ईमेल संवादापुरती मर्यादित आहेत वरील लोकांची नावे समोर आली आहेत त्यांच्यावर कोणतेही गुन्हे किंवा इतर कृत्यांशी संबधित नाहीत इमेल्स व इतर कारणासांठी उल्लेख आले आहेत.
अनुराग कश्यप म्हणतो आयुष्यात कधी शांघायला गेलो नाही
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतील अनुराग कश्यपने आपले मत व्यक्त केले तो म्हणाला की या फाईल्स मध्ये माझे नाव कधीही आलेले नाही. माझा कोणताच संबध नाही, तसेच मला प्रत्येक महिन्याला 15 च्या वर कार्यक्रमांची निमंत्रणे येतात यापैकी मी अनेकांना उत्तर सुद्धा देत नाही. आणि खर सांगायचे म्हणजे मी आयुष्यात कधी शांघायला गेलेलो नाही.