जन्‍मदात्‍या आईनेच मुलीला अस्‍वलाच्‍या ताेंडी दिलं आणि…

अस्वलाच्या गोठयात आईने मुलीला दिले ढकलून
अस्वलाच्या गोठयात आईने मुलीला दिले ढकलून
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जन्मदाती आईनेच आपल्‍या मुलीला मृत्‍यूच्‍या ताेंडी दिल्‍याचा  धक्कादायक प्रकार उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंदमध्‍ये घडला. ताश्कंद या भागात अनेक प्राणीसंग्रहालये आहेत. एका प्राणीसंग्रहालयात आई आपल्या 3 वर्षांच्या मुलीला फिरवण्याच्या बहाण्याने आणले होते. नंतर तिने चिमुरडीला अस्वल दाखवण्याच्या बहाण्याने त्‍याच्या घेरात ढकलून दिले.

एक तीन वर्षांची मुलगी तिच्या आईसोबत प्राणीसंग्रहालयाला भेट देण्यासाठी आली होती. अस्वल पाहण्‍यासाठी चिमुकली रेलिंगजवळ उभी राहिली. अस्वल दाखविण्याच्या बहाण्याने महिलेने तिच्या मुलाला रेलिंगवरून ढकलून दिले.

मुलगी त्‍याच्या आवारात पडताच अस्वल सक्रिय झाले. त्‍याने  मुलीकडे धाव घेतली. जुजू नावाच्या अस्वलाने मुलीला कोणतीही इजा केली नाही.सुदैवाने, प्राणीसंग्रहालयाचे कर्मचारी वेळेत अस्वलाच्या परिसरात पोहोचले आणि मुलीला सुखरूप बाहेर काढले. या घटनेत मुलीला किरकोळ दुखापत झाली.

मुलीच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महिलेवर मुलाच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. यामध्ये ती दोषी आढळल्यास तिला किमान १५ वर्षांची शिक्षा होऊ शकते. प्राणीसंग्रहालयाच्या प्रवक्त्याचे म्हणणे आहे की, या महिलेने मुलीला मुद्दाम कोठडीत फेकले होते. याशिवाय तेथे उपस्थित लोकांनीही त्यांच्या निवेदनात असेच म्हटले आहे. त्यावेळी या महिलेला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत तिने  मुलीला अस्वलाकडे फेकून दिले होते. या प्रकरणाची पाेलीस माहिती घेत आहेत.

हेही वाचलं का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news