Donald Trump on Iran : मोजतबा खामेनी ९० टक्के निकामी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

इराणकडे नौदल, हवाई दल नाही; सर्व काही संपले आहे
Donald Trump on Iran
Donald Trump on Iran Pudhari
Published on
Updated on

Donald Trump on Iran : "इराणचे सर्वोच्च लष्करी नेतृत्व नष्ट करण्यात आले आहे. देशाचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मुलगा मोजतबा खामेनी हा ९० टक्के निकामी झाला आहे," असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'फॉक्स न्यूज'शी बोलताना केला. तसेच इराणकडे आता नौदल आणि हवाई दल नाही. या देशाचे सर्व काही संपले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

इराणचे सर्व नेते मारले गेले आहेत : ट्रम्प

अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा संघर्ष पेटला आहे. हल्ले आणि प्रतिहल्ले सुरू आहेत. अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीत "इराणची नाकेबंदी" पुन्हा लागू करण्याची योजना जाहीर केली आहे. इराणकडूनही चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. १३ जुलै) 'फॉक्स न्यूज'शी बोलताना ट्रम्प म्हणाले की, अमेरिका आणि इस्रायलने अलीकडेच केलेल्या समन्वित लष्करी हल्ल्यांमुळे इराणची लष्करी क्षमता पूर्णपणे नष्ट झाली आहे. या देशाकडे आता नौदल नाही. त्यांच्याकडे हवाई दल नाही. सर्व काही संपले आहे. त्यांची विमानविरोधी यंत्रणा नष्ट झाली आहे. त्यांचे सर्व नेते मारले गेले आहेत."

Donald Trump on Iran
Iran Hit List world leaders : डोनाल्‍ड ट्रम्प, मेलोनी अन् मॅक्रॉन... इराणने जारी केली 'हिट लिस्ट', १३ जागतिक नेत्यांची नावे

इराणचे वरिष्ठ लष्करी नेतृत्व नष्ट

अमेरिकेने राबवलेल्या मोहिमेदरम्यान इराणचे वरिष्ठ लष्करी नेतृत्व नष्ट करण्यात आले. त्यांचे सर्वोत्तम नेते मारले गेले आहेत. ते संपले आहेत. खोमेनी संपले आहेत. मोजतबा खामेनी यांना दीर्घकाळापासून त्यांचे दिवंगत वडील अयातुल्ला अली खामेनी यांचे उत्तराधिकारी म्हणून प्रमुख दावेदार मानले जात होते. ते देखील जवळपास संपले आहेत. तो ९०% संपला आहे," असे ट्रम्प एका व्हायरल क्लिपमध्ये म्हणताना ऐकू येतात.

Donald Trump on Iran
Donald Trump On Iran Hit List: आधी खिडकी बंद करा मी इराणच्या हिट लीस्टवर आहे... ट्रम्प यांनी विमानात असताना नेमकं काय सांगितलं

मोजतबा दुखापतीतून सावरत असल्‍याचा इराणने केला होता दावा

दरम्यान, मोजतबा खामेनी हे आधीच्या हवाई हल्ल्यात झालेल्या गंभीर दुखापतीतून सावरत असल्याचे इराणने यापूर्वी जाहीर केले आहे. नुकतेच अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यसंस्कार सोहळ्यावेळी ते अनुपस्थित होते.

Donald Trump on Iran
Trump Praises PM Modi : "शांत आणि जबरदस्त, मी त्यांच्यासारखा नाही"; ट्रम्प यांनी केले PM मोदींचे भरभरून कौतुक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news