

Donald Trump On Iran Hit List: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज मोठा दावा केला. त्यांनी इराणकडून आपल्याला धोका असून आपण इराणच्या हिटलीस्टवरील सर्वात वरची व्यक्ती आहोत असं ते म्हणाले. विशेष म्हणजे त्यांनी एअर फोर्स वन या त्यांच्या विमानात असताना हे वक्तव्य केलं आहे. त्यांनी पत्रकारांना त्यांच्या खिडकीचे ब्लाईंडर्स खाली घेण्यास सांगितले अन् आपल्या जीविताला असलेल्या धोक्याबाबत कल्पना दिली.
एका पत्रकाराने डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांनी खिडकीचे ब्लाईंडर्स बंद करण्याच्या सुचनेबाबत विचारलं. त्यावेळी ते म्हणाले की, 'कारण तुम्ही सर्व एका धोकादायक विमानात बसला आहे. आपल्याला एका विश्वासास पात्र नसलेल्या लोकांशी डील करायचं आहे. ते (इराण) खूप विचित्र लोकं आहेत.'
दुसऱ्या एका रिपोर्टने डोनाल्ड ट्रम्प यांना तुम्हाला इराणकडून धोका आहे का असं विचारलं. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, 'मला सतत धोका असतो. मी तर त्यांच्या हिट लीस्टवर सरवात वरच्या क्रमांकावर आहे. तुमच्या आधी, माझाच नंबर आहे. मात्र जर मी मेलो तर तुम्ही देखील मरणार.'
डोनाल्ड ट्रम्प हा संवाद एअर फोर्स वनवर माध्यमांशी बोलताना करत होते. त्यावेळी त्यांनी टर्कीमधील नाटो समीटमध्ये गेल्यानंतर ट्रम्प यांनी जुन्या ब्लू एअर फोर्स वन विमानातून प्रवास केला होता. त्यांनी नवीन कतारने गिफ्ट केलेल्या लाल आणि पांढऱ्या रंगाच्या विमानातून प्रवास करणं टाळलं होतं.
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतची डील रद्द झाल्याच्या वक्तव्यावर देखील पुन्हा भाष्य केलं. ते म्हणाले की, 'आमच्या लष्कराने इराणविरूद्ध मोठा विजय मिळवला आहे. त्यांच्याकडे आता फारच कमी शक्ती राहिली आहे. त्यांना कोणत्या परिस्थितीत डील करायची आहे. मला ते डील करण्यासाठी योग्य आहेत की नाही हे माहिती नाही. ते या कराराची सन्मान करणार की नाही हे देखील मला माहिती नाही.'