Trump Praises PM Modi : "शांत आणि जबरदस्त, मी त्यांच्यासारखा नाही"; ट्रम्प यांनी केले PM मोदींचे भरभरून कौतुक

पंतप्रधानपदी मोदी आहेत तोपर्यंत भारत मोठी भूमिका बजावत राहील
Trump Praises PM Modi
Trump Praises PM ModiPudhari
Published on
Updated on

Donald Trump praises PM Modi : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भरभरून कौतुक केले. फ्रान्समधील एव्हियन-ले-बॅन्स येथे आयोजित जी-७ (G-7) परिषदेदरम्यान ट्रम्प यांनी पीएम मोदींचे वर्णन शांत, संयमी आणि जबरदस्त असे केले आहे. तसेच, "मी त्यांच्यासारखा नाही," असेही त्‍यांनी नमूद केले.

मी त्यांच्यासारखा नाही...

जी-७ परिषदेतील एका वर्किंग लंचदरम्यान जगभरातील राष्ट्रप्रमुख उपस्थित होते, तिथे ट्रम्प यांनी पीएम मोदींच्या दिशेने इशारा करत त्यांची प्रशंसा केली. लंच दरम्यान ट्रम्प पीएम मोदींबद्दल म्हणाले, "मी पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा शांत, संयमी आणि जबरदस्त नाही... जरा त्यांच्याकडे पाहा."

Trump Praises PM Modi
Donald Trump : इराणचा 'सायकॉलॉजीकल' 'गेम'! ट्रम्प यांच्या 'सायकोपॅथिक' वर्तनाचा अभ्यासासाठी घेतली थेट मानसोपचारतज्ज्ञांची मदत!

पंतप्रधानपदी मोदी आहेत तोपर्यंत भारत मोठी भूमिका बजावत राहील

पश्चिम आशियामध्ये भारताने कोणतीही भूमिका बजावावी अशी अपेक्षा आहे का, असे विचारले असता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "हो, नक्कीच. मला वाटते की प्रत्येक गोष्टीत भारताची मोठी भूमिका असते. जोपर्यंत ते (पंतप्रधान नरेंद्र मोदी) नेते आहेत, तोपर्यंत भारत मोठी भूमिका बजावत राहील."

Trump Praises PM Modi
Donald Trump: “जरा सांभाळून, नाहीतर एकट्यालाच लढावे लागेल!” इराणवरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा नेतन्याहूंना इशारा

मंगळवारी झालेल्‍या भेटीत पूर्वीसारखा 'आपलेपणा' दिसला नव्‍हता

यापूर्वी मंगळवारी, फ्रान्सच्या एव्हियनमध्ये जी-७ परिषदेच्या आऊटरीच सत्रादरम्यान पीएम मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भेट झाली होती. दोघांनी एकमेकांना अभिवादन केले. ट्रम्प आणि मोदी यांनी हस्तांदोलनही केले, मात्र पूर्वीसारखीचा आपलेपणा या भेटीत दिसून आला नाही. दुसऱ्या कार्यकाळात ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. ट्रम्प भारताच्या विरोधात सातत्याने वक्तव्ये करत आहेत. त्यांनी आधी टॅरिफ लावले आणि नंतर 'ऑपरेशन सिंदूर'वर भारताला बोचणारे वक्तव्य केले होते. यामुळे दोन्ही देशांतील संबंधांमध्ये कटुता आली आहे.

Trump Praises PM Modi
Trump Middle East agreement | करारामुळे मध्य पूर्वेचे चित्र बदलेल; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

वादांवर कायमस्वरूपी तोडगा हा केवळ चचेतूनच निघतो : पंतप्रधान मोदी

जी-७ परिषदेच्या आऊटरीच सत्राला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, वादांवर कायमस्वरूपी तोडगा हा केवळ चर्चा, मुत्सद्देगिरी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यातूनच निघू शकतो, यावर भारताचा विश्वास आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतील सागरी व्यापारातील अडथळ्यांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले असून, या संघर्षात अनेक भारतीय नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असल्याचेही पीएम मोदींनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news