Katy Perry dating Justin Trudeau
पॅरिस: पॉप स्टार केटी पेरी आणि कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या डेटिंगची चर्चा पुन्हा एकदा सुरू आहे. शनिवारी (दि. २५) रात्री दोघेही पॅरिसमध्ये हातात हात घालून फिरताना दिसले. केटी पेरीच्या ४५ व्या वाढदिवसानिमित्त या दोघांनी 'रोमान्सची राजधानी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पॅरिसमध्ये एकत्र वेळ घालवला असून त्यांनी त्यांच्या नात्याला अधिकृतपणे दुजोरा दिला आहे.
व्हायरल झालेल्या छायाचित्रांमध्ये हे दोघे हातात हात घालून चालताना स्पष्टपणे दिसत आहेत. पेरी आणि ट्रुडो यांनी पॅरिसमधील प्रसिद्ध 'क्रेझी हॉर्स पॅरिस' येथे कॅबरे शो पाहिला. शो संपल्यानंतर दोघेही थिएटरमधून एकत्र बाहेर पडले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, ते हातात हात घालून चालत होते. त्यांच्या या कृतीमुळे त्यांच्यातील प्रेमसंबंधांबद्दलच्या चर्चांना आणखी उधाण आले आहे.
पॅरिस भेटीच्या काही आठवड्यांपूर्वीच कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ कॅटी पेरीच्या यॉटवर हे दोघे कीस करताना दिसले होते. जुलैमध्ये मॉन्ट्रियलमध्ये डिनर डेट आणि नंतर माउंट रॉयल पार्कमधील फेरफटक्यामुळे त्यांच्यातील संबंध पहिल्यांदा चर्चेत आले होते. ट्रुडो हे पेरीच्या 'लाइफटाइम्स टूर'मधील मॉन्ट्रियल कॉन्सर्टलाही उपस्थित होते. या दोघांनीही त्यांच्या संबंधांवर कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. त्यांच्या डेटिंगच्या अफवा यापूर्वीही पसरल्या होत्या, परंतु दोघांनीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
पेरीने जून २०२५ मध्ये अभिनेता ऑरलँडो ब्लूमसोबत सात वर्षांचे नातं तोडल. दोघांना डेझी डव्ह नावाची एक मुलगी आहे, जिचे दोघांनी मिळून पालकत्व स्विकारले आहे.