

हॉलीवूडच्या चकाकत्या दुनियेत आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात सध्या एक अनपेक्षित कपल चर्चेत आहे ते म्हणजे प्रसिद्ध पॉपस्टार कॅटी पेरी आणि कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो. अलीकडेच या दोघांना कॅलिफोर्नियातील सांताबार्बरामध्ये एका आलिशान यॉटवर एकत्र, अगदी रोमँटिक मूडमध्ये पाहिले गेले.
कॅटी ब्लॅक स्वीमसूटमध्ये, तर जस्टिन ट्रूडो शर्टलेस आणि डेनिम पँटमध्ये दिसत आहेत. या दोघांनी एकमेकांना मिठी मारलेली असून, एका क्षणी जस्टिन तिला गालावर किस करताना दिसतात. सोशल मीडियावर त्यांच्या या ‘केमिस्ट्री’चे फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. गेल्या काही काळापासून या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू आहेत. जुलै 2025 मध्ये या चर्चा सुरू झाल्या. तेव्हा दोघांंना मॉन्ट्रियलमध्ये डिनर डेटवर गेले होते. यानंतर जस्टिन यांनी कॅटीच्या कॅनडातील शोला उपस्थिती लावल्याने ही अफवा अधिकच बळकट झाली.
आता या यॉटवरील फोटोंनी दोघांमध्ये अफेयर सुरू आहे, हेच सिद्ध केले आहे. कॅटी जून 2025 मध्ये आपल्या दीर्घकाळच्या जोडीदार ऑरलँडो ब्लूमपासून 7 वर्षांनी विभक्त झाली होती. त्यांना डेझी डोव्ह नावाची चार वर्षांची मुलगी आहे. विभक्तीनंतरही दोघं एकत्र पालकत्व निभावत आहेत. जस्टिन ट्रूडो यांनी ऑगस्ट 2023 मध्ये पत्नी सोफी ग्रेगॉयरपासून वेगळं होत असल्याची घोषणा केली होती. दोघांचा18 वर्षांचा संसार होता. त्यांना तीन मुलं आहेत.