प्रेम की फक्त मैत्री? पॉपस्टार केटी पेरी आणि कॅनडाच्या माजी पंतप्रधानांची 'सिक्रेट' डेट
पुढारी वृत्तसेवा
प्रसिद्ध पॉपस्टार केटी पेरी आणि कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे मॉन्ट्रियलमध्ये एकत्र डिनर डेटवर दिसल्याने त्यांच्या नात्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
दोघेही मॉन्ट्रियलमधील एका आलिशान रेस्टॉरंटमध्ये जेवताना स्पॉट झाले.
या दोघांना एकत्र पाहिल्यानंतर चाहते आणि माध्यमांमध्ये त्यांच्या नात्याबद्दल विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
जेवणानंतर त्यांनी स्वतः रेस्टॉरंटच्या किचन स्टाफचे आभार मानले. रेस्टॉरंटच्या एका प्रतिनिधीने सांगितले की, "केटी आणि जस्टिन यांनी खूप छान वेळ घालवला."
ही डिनर डेट अशा वेळी झाली आहे, जेव्हा केटी आणि जस्टिन दोघेही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील मोठ्या बदलांमधून जात आहेत.
गेल्या महिन्यात केटीने तिचा पार्टनर आणि प्रसिद्ध अभिनेता ऑरलॅंडो ब्लूमसोबत जवळपास दशकभराचे नाते आणि साखरपुडा मोडल्याची घोषणा केली होती.
दुसरीकडे, जस्टिन ट्रुडो यांनी ऑगस्ट २०२३ मध्ये, लग्नाच्या १८ वर्षांनंतर पत्नी सोफी ग्रेगोइर ट्रुडो यांच्यापासून विभक्त होत असल्याची घोषणा केली होती. त्यांना तीन मुलं आहेत.
केटी पेरी सध्या तिच्या 'लाइफटाइम्स टूर'साठी कॅनडामध्ये आहे. या दौऱ्याअंतर्गत ती कॅनडातील अनेक शहरांमध्ये कार्यक्रम करणार आहे.
डिनर डेटपूर्वी या दोघांनी दिवसभर एकत्र वेळ घालवला. त्यांना माउंट रॉयल पार्कमध्ये फिरतानाही पाहण्यात आले.
दरम्यान, या डेट नाईटवर त्यांचं जेवण सर्व्ह करणाऱ्या शेफ डॅनी स्माइल्सने “दोघांमध्ये कोणतीही रोमँटिक चर्चा नव्हती,” असे सांगितले.
सध्यातरी हे नातं फक्त मैत्रीचं आहे की काही वेगळं, हे स्पष्ट झालेलं नाही. मात्र, दोघांनी चाहत्यांना आणि मीडियाला निश्चितच आश्चर्याचा धक्का दिला आहे.