Jeffrey Epstein Alive: जेफ्री एपस्टीन जिवंत आहे...? माझा व्हिडिओ व्हायरल होतोय कारण...

 Jeffrey Epstein Alive
Jeffrey Epstein Alivepudhari
Published on
Updated on

Jeffrey Epstein Alive: गेल्या आठवड्याभरापासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत जेफ्री एपस्टीन दिसल्याचा आणि तो जिवंत असल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडिओ एका महामार्गावर शूट करण्यात आला होता. या व्हिडिओत जेफ्री सारखा दिसणार माणूस हा आपली कनव्हर्टेबल गाडी रूफ डाऊन करून चालवताना दिसत आहे. त्याने बेसबॉल कॅप उलटी करून घातली होती. दरम्यान, जो व्यक्ती हा व्हिडिओ शूट करत होता. तो सतत जेफ्री एपस्टीन जिवंत आहे जेफ्री एपस्टीन जिवंत आहे असं सांगत होता.

 Jeffrey Epstein Alive
Fake War Videos : युद्धकाळात ‌‘एआय‌’चा गैरवापर

हा व्हिडिओ अल्पावधीतच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पाल्म बीच पेट या नावाच्या फ्लोरिडामधील एका व्यक्तीने अजून एक व्हिडिओ शेअर करत एपस्टीन जिवंत असल्याबद्दल मोठा खुलासा केला.

 Jeffrey Epstein Alive
Cricket Viral Video : आधी भांगडा, मग रन-आऊट! यष्ट्या उडवण्यापूर्वी फिल्डिंग टीमचा मैदानातच रंगला भन्नाट डान्स

पेटने ट्विटवर हा व्हिडिओ शेअर केला असून तो म्हणतो, 'हाय मी पाल्म बीच बेट. माझा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने मी माझी I-95 चालवत असताना अचानक व्हिडिओ शूट केला. मला काही कळालेच नाही. दुसऱ्या दिवशी माझ्या लक्षात आलं की मी आता एक व्हायरल सेन्सेशन झालो आहे. माझा फोन हा तब्बल चार तास डाऊन होता. मला माझा फोन असंख्य कमेंट्स आणि त्या व्हिडिओने भरला होता. मला चांगलाच भाव मिळाला आहे. हे खूप भन्नाट आहे थँक यू.'

 Jeffrey Epstein Alive
Black Panther Viral Video: जंगलात पहिल्यांदाच एकत्र दिसले दोन ब्लॅक पँथर; असा व्हिडिओ तुम्ही कधीच पाहिला नसेल!

पेटने शेअर केलेल्या व्हिडिओत कॅमेऱ्यामागचा व्यक्ती त्याला तू जेफ्री एपस्टीन आहेस का असं विचारतो त्यावेळी पेट हा स्पष्टपणे नाही मी जेफ्री एपस्टीन नाही मी पाल्म बीत पेट आहे असं सांगतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news