Cricket Viral Video : आधी भांगडा, मग रन-आऊट! यष्ट्या उडवण्यापूर्वी फिल्डिंग टीमचा मैदानातच रंगला भन्नाट डान्स

या व्हिडिओने नेटकऱ्यांचे चांगलेच मनोरंजन केले असून त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
Cricket Viral Video : आधी भांगडा, मग रन-आऊट! यष्ट्या उडवण्यापूर्वी फिल्डिंग टीमचा मैदानातच रंगला भन्नाट डान्स
Published on
Updated on

नवी दिल्ली : भारतातील एका स्थानिक कनिष्ठ गटाच्या क्रिकेट सामन्यादरम्यान एक अत्यंत मजेशीर घटना घडली. फलंदाजाला धावबाद करण्यापूर्वी काही तरुण क्रिकेटपटूंनी मैदानातच 'भांगडा' केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओने नेटकऱ्यांचे चांगलेच मनोरंजन केले असून त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

मैदानात नेमके काय घडले?

हा प्रकार दोन किशोरवयीन संघांमधील सामन्यात घडला. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, स्ट्रायकर फलंदाज चेंडू फटकावल्यानंतर धाव घेण्यासाठी सरसावतो. ही धाव पूर्ण होते. त्याच वेळी क्षेत्ररक्षकाने बॉलिग एन्डला फेकलेला चेंडू दूर जातो. त्याच वेळी दुसरी धाव घेण्यासाठी दोन्ही फलंदाजांमध्ये कॉल होतो. दोघेही पळायला लागतता, पण नॉन स्ट्रारकर एन्डला असणारा फलंदाज अचानक माघारी परततो आणि त्याचवेळी स्ट्रायकर एन्डचा फलंदाजही नॉन स्ट्रायकर एन्डला येतो. या गोंधळानंतर दोन्हीपैकी एकानेही दुसऱ्या टोकाकडे धाव घेण्याचा प्रयत्न करत नाही. दोन्ही फलंदाज खेळपट्टीच्या एकाच टोकाला येऊन उभे राहतात. दरम्यान, क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकाकडे चेंडू फेकतो.

Cricket Viral Video : आधी भांगडा, मग रन-आऊट! यष्ट्या उडवण्यापूर्वी फिल्डिंग टीमचा मैदानातच रंगला भन्नाट डान्स
T20 World Cup Final : शिवम दुबेच्या ‘रन आऊट’मध्ये लपलाय विश्वविजेतेपदाचा फॉर्म्युला! काय आहे २००७ चा ‘तो’ अद्भूत योगायोग?

दोन्ही फलंदाज एकाच एन्डला उभे असल्याचे पाहून, यष्टीरक्षक आणि इतर क्षेत्ररक्षक यष्ट्या उडवण्यापूर्वी आनंदाच्या भरात 'भांगडा' करायला सुरुवात करतात. हा डान्स पूर्ण झाल्यानंतर यष्टीरक्षक शांतपणे यष्ट्या उडवून फलंदाजाला धावबाद करतो.

सोशल मीडियावर प्रतिकियांचा पाऊस

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

एका युजरने कमेंट करताना म्हटले, ‘तरुण टॅलेंटचा हा किती विलक्षण रन-आऊट आहे.’ तर दुसऱ्या एका युजरने गमतीने लिहिले, ‘लहान मुले आहेत, त्यांना आनंद घेऊ द्या. जर मोठ्यांच्या सामन्यात असे घडले असते, तर फलंदाजाला आपली जागा परत मिळवण्याची संधी मिळाली असती.’

Cricket Viral Video : आधी भांगडा, मग रन-आऊट! यष्ट्या उडवण्यापूर्वी फिल्डिंग टीमचा मैदानातच रंगला भन्नाट डान्स
IND vs NZ : चॅम्पियन्स ट्रॉफी ते टी-२० वर्ल्ड कप व्हाया WTC..! भारत-न्यूझीलंड 'Final'मध्ये भिडणारे पहिलेच प्रतिस्पर्धी

खिलाडूवृत्तीवर प्रश्नचिन्ह?

काही नेटकऱ्यांनी मात्र या अतिउत्साही सेलिब्रेशनवर टीका केली आहे. एका युजरने बांगलादेशी क्रिकेटपटू तौहीद रणाचे उदाहरण देत म्हटले की, ‘बाद झाल्यावर फलंदाजाला वाईट वाटते, मग जल्लोष कशासाठी?’ तर अन्य एकाने लिहिले की, ‘विकेट मिळाल्यावर आनंद साजरा करणे हा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा हक्क आहे, पण अशा प्रकारचे सेलिब्रेशन खेळ भावनेला धरून नाही.’

Cricket Viral Video : आधी भांगडा, मग रन-आऊट! यष्ट्या उडवण्यापूर्वी फिल्डिंग टीमचा मैदानातच रंगला भन्नाट डान्स
Real Madrid Nazi salute controversy : रिअल माद्रिदच्या सामन्यात ‘नाझी सॅल्युट’..! ‘UEFA‘कडून स्पॅनिश क्लबला 16 लाखांचा दंड

दिग्गज खेळाडूंचे अनोखे सेलिब्रेशन

मैदानातील असे अतरंगी सेलिब्रेशन केवळ कनिष्ठ स्तरावरच मर्यादित नाही. केएल राहुलचा 'कांतारा' चित्रपटापासून प्रेरित झालेला अवतार असो किंवा विराट कोहलीने अनिल कपूर यांच्या डान्स स्टेप्सची केलेली नक्कल असो, काहींचे पुष्पा स्टाईक सेलिब्रेशन असो; स्टार खेळाडूही अनेकदा अशा पद्धतीचा आनंद व्यक्त करताना दिसले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news