Israel Angry With Jared Kushner: ट्रम्प यांचा जावई बदला घेतोय, इस्त्रायल जाम भडकला... बोर्ड ऑफ पीसवरून नेमकं काय झालं?

इस्त्रायलने नाराजी व्यक्त केली असून इस्त्रायलच्या सुरक्षा कॅबिनेटच्या अनेक मंत्र्यांनी यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जेटर्ड कुशनर यांना जबाबदार धरलं आहे.
Israel Angry With Jared Kushner
Israel Angry With Jared Kushnerpudhari photo
Published on
Updated on

Israel Angry With Jared Kushner: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखाली बोर्ड ऑफ पीसची स्थापना झाली आहे. त्यात इस्त्रायल हा अत्यंत जवळचा सहकारी देश आहे. मात्र तोच देश आता अमेरिकेवर जाम भडकला आहे. गाझामधील संघर्ष संपवण्यासाठी आणि तिथं शांती प्रस्थापित करण्यासाठी या बोर्ड ऑफ पीसची स्थापना करण्यात आली आहे.

Israel Angry With Jared Kushner
Iran protests | इराणमध्ये आंदोलकांची 'फाशी' रद्द की डोनाल्‍ड ट्रम्प खाेमेनींच्या 'शब्दजाळ्यात' अडकले?

या बोर्डमध्ये मध्य-पूर्वेतील अमेरिकेचे सहकारी देश तुर्की आणि कतार यांचा समावेश करण्यात आला आहे. यावर इस्त्रायलने नाराजी व्यक्त केली असून इस्त्रायलच्या सुरक्षा कॅबिनेटच्या अनेक मंत्र्यांनी यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जेटर्ड कुशनर यांना जबाबदार धरलं आहे. इस्त्रायलने या निर्णयाला कडाडून विरोध केला जात आहे.

Israel Angry With Jared Kushner
Iran-Israel War : इराण-इस्त्रायल संघर्षादरम्यान भारताचे ऑपरेशन सिंधू; इराणमधून ११० भारतीय विद्यार्थी मायदेशी परतले

बंद दाराआडच्या बैठकीत काय झालं?

रविवारी याबाबत इस्त्रायली सुरक्षा कॅबिनेटची एक बॅठक झाली. बंद दरवाजाआड झालेल्या या चर्चेत सामील असलेल्या लोकांनी सांगितले की, कुशनर हे इस्त्रायसोबत बदला घेत आहेत. इस्त्रायलने राफा क्रॉसिंग पुन्हा सुरू करण्यास नकार दिल्यानं हा बदला घेतला जात आहे. कॅबिनेट मंत्र्यांनी या भागात कुशनर यांचे वैयक्तिक लागबांधे बोर्ड ऑफ पीसच्या स्ट्रक्चर प्रभावित करत आहेत असा आरोप केला आहे.

Israel Angry With Jared Kushner
Israel On Pakistan Army In Gaza: गाझात पाक लष्कर; इस्त्रायलनं स्पष्टच सांगितलं.... अमेरिकेसह पाकिस्तान तोंडावर आपटलं

इस्त्रायलचे वर्तमानपत्र 'द जेरूसलेम पोस्ट' नुसार मंत्र्यांनी सांगितलं की कुशनर यांनी २०२० मध्ये इस्त्रायलच्या सार्वभौमत्वाच्या घोषणेची हवा काढून टाकली आहे. त्यांनी सांगितलं की कुशनर यांचे अरबी नेत्यांसोबत जवळचे राजनैतिक आणि आर्थिक संबंध राहिले आहेत. त्यामुळे ते आता जास्तच अडचणी निर्माण करत आहेत.

Israel Angry With Jared Kushner
इस्रायलमधील जनता पुन्‍हा ‘रस्‍त्‍या’वर!, नेतन्‍याहू सरकारच्‍या ‘न्‍यायालयीन फेरबदला’स तीव्र विरोध

ट्रम्प यांच्या जावयावर भडकले इस्त्रायली मंत्री

इस्त्रायली अधिकाऱ्यांनी अमेरिका प्रशासनासोबत आम्ही सातत्यानं अन् प्रभावीपणे काम करतो आहोत. यापूर्वी झालेल्या एका कॅबिनेट बैठकीत एका मंत्र्यांनी कुशनर यांच्या जागतिक शांतीबाबत काही काल्पनिक विचार आहेत. हे विचार इस्त्रायलच्या हिताचे नाहीत.

कॅबिनेटने या गाझाशी संबंधित कोणात्याही समितीत तुक्री आणि कतर यांच्या प्रतिनिधित्वाला विरोध केला जाईल. पुढच्या दोन आठवड्यात याबाबतच्या परिस्थितीची पुन्हा समिक्षा केली जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news