

Israel On Pakistan Army In Gaza: अमेरिकेने गाझामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत काही देशांच्या लष्करांना या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाचारण करण्यात येणार आहे. त्यात पाकिस्तानी लष्कराचा देखील समावेश आहे.
याबाबत इस्त्रायलचे भारतातील राजदूत रूव्हन अझर यांना विचारलं असता त्यांनी इस्त्रायल गाझा शांतता मोहीमेत पाकिस्तानी लष्कराचा सहभाग आम्हाला मान्य नाही. त्यांनी हमास आणि पाकिस्तानमधील दहशतवादी ग्रुप लष्कर ए तैयब्बा यांच्यातील वाढत्या लिंक्सबाबत इस्त्रायल चिंतेत असेल्याचे सांगितलं.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना अझर यांनी सांगितलं की, जोपर्यंत हमास या दहशतवादी संघटनेला पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याशिवाय गाझामध्ये कोणतीही भविष्यातील अरेंजमेंट करता येणं शक्य नाही.
युनायटेड स्टेटने पाकिस्तानसह काही देशांना संपर्क केला आहे. त्या देशांच्या लष्करांना गाझामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी योगदान देण्यास सांगण्यात आल्याचे वृत्त आहे. याबाबत बोलताना अझर यांनी यात पाकिस्तानचा सहभाग इस्त्रायलला मान्य नाही असं स्पष्ट केलं.
ते म्हणाले, 'सध्या गाझामधील परिस्थिती सुधारून पुढं जाण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्यासाठी आधी हमासला संपवणं गरजेचं आहे. हे वगळून दुसरा कोणताही मार्ग नाही.'
इस्त्रायलचे राजदूत पुढं म्हणाले की, पाकिस्तानने आधीच ते आपले सैन्य पाठवण्यासाठी उत्सुक नाहीयेत असं सांगितलं आहे. त्यांना हमासोबत लढायचं नाहीये. अशा परिस्थितीत या भागात स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठीच्या फौजेची कल्पना अर्थहीन आहे.
अझर यांना इस्त्रायल पाकिस्तानी लष्कर गाझामध्ये येणं सहज स्विकारतील का असं विचारलं असता त्यांनी पाकिस्तानी लष्कराचे दहशतवादी संघटनांशी असलेले लागेबांधे पाहता स्पष्टने नकार दिला. इस्त्रायल कधीच पाकिस्तानी लष्कराला गाझामध्ये येण्याची संमती देणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं.
ते म्हणाले की, 'एखादा देश दुसऱ्यावर त्याचवेळी सहकार्य करतो ज्यावेळी त्यामध्ये विश्वासाचं नातं असतं. ज्यांच्यासोबत त्यांचा व्यवस्थित राजनैतिक डायलॉग सुरू असतो. अशी कोणतीही परिस्थिती सध्या पाकिस्तानसोबत नाहीये.' अझर यांनी इस्त्रायल पाकिस्तानकडं विश्वासार्ह किंवा मान्यताप्राप्त भागीदार म्हणून पाहत नाही हे स्पष्ट केलं.
हमासच्या भविष्याबाबत अझर म्हणाले की, इस्त्रायल सर्वात आधी उरलेल्या बंधकांना सोडवण्याला प्राधान्य देत आहे. त्यात मृत झालेल्या बंधकांचा देखील समावेश आहे. त्याचबरोबर त्यांचे हमासच्या लष्करी आणि राजकीय इन्फ्रास्ट्रक्चर उद्ध्वस्त करण्याला देखील प्राधान्य आहे. अझर यांनी हमास आणि त्यांचा पुळका येणारे तुर्की आणि कतार सारखे देश हे जे खरंच गरजेचं आहे त्याला फाटा देण्याचा प्रयत्न करत आहेत.
अझर म्हणाले, 'हमासला पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याशिवाय दुसरा कोणताही प्लॅन लागू करणं अशक्य आहे.' जर डोनाल्ड ट्रम्प यांच्या योजनेवर अंमलबजावणी करण्यासाठी हमासला बाध्य करण्यात कोणत्याही प्रकारे राजनैतिक दबाव कमी पडला तर इस्त्रायलपुढे स्वतःच कारवाई करण्याशिवाय कोणताही पर्याय उरणार नाहीये.