Israel Iran nuclear tensions | पाकिस्तान इस्रायलवर अणुबॉम्ब टाकेल; इराणच्या दाव्याने जगभरात खळबळ

Israel Iran nuclear tensions | इस्रायलविरोधात इस्लामिक राष्ट्रांनी एकत्र न आल्यास नाश अटळ - पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचा इशारा, OIC ला तातडीची बैठक बोलवण्याची मागणी
Israel Iran nuclear tensions
Israel Iran nuclear tensionsPudhari
Published on
Updated on

Israel Iran nuclear tensions Khawaja Asif statement IRGC commander Mohsen Rezaei Middle East Nuclear Conflict Pakistan OIC

नवी दिल्ली/तेहरान : इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असताना, एका इराणी वरिष्ठ अधिकाऱ्याने खळबळजनक दावा केला आहे. "जर इस्रायलने इराणवर अणुबॉम्ब टाकला, तर पाकिस्तान इस्रायलला अणुबॉम्बने प्रत्युत्तर देईल," असा दावा इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सदस्य आणि इराण रेव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स (IRGC) चे वरिष्ठ कमांडर जनरल मोहसीन रेजाई यांनी केला आहे.

रेजाई यांनी हा दावा इराणी सरकारच्या वृत्तवाहिनीवर बोलताना केला. मात्र, पाकिस्तान सरकारने हा दावा तात्काळ फेटाळून लावला आहे.

Israel Iran nuclear tensions
Israel Iran conflict | जगातील सर्वात मोठ्या गॅस प्रकल्पावर इस्रायलचा बॉम्ब हल्ला; जागतिक तेल बाजार हादरला! पेट्रोल, गॅस महागणार...

पाकिस्तानकडून नकार

पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी या दाव्याचा निषेध करत स्पष्ट केले की, इस्लामाबादने असा कोणताही आण्विक प्रत्युत्तराचा इराणला शब्द दिलेला नाही. "आम्ही अशा प्रकारची कोणतीही आण्विक प्रतिज्ञा केलेली नाही," असे ते म्हणाले.

तथापि, पाकिस्तानने इस्रायलविरोधात इराणला पाठिंबा असल्याचे उघडपणे जाहीर केले आहे. इस्रायलकडून तेहरानवर हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानने "इराणच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू" असे विधान केले आणि मुस्लिम राष्ट्रांनी एकत्र यावे, असे आवाहन केले.

Israel Iran nuclear tensions
China rare earth export ban | चीनच्या बंदीमुळे भारतीय EV क्षेत्र अडचणीत; महिनाभरात बिघडू शकते इलेक्ट्रिक वाहन उद्योगाचे गणित...

मुस्लिम राष्ट्रांना एकत्र येण्याचे आवाहन

14 जून रोजी पाकिस्तानच्या संसदेत बोलताना संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले, “इस्रायलने इराण, यमन आणि पॅलेस्टाईनला लक्ष्य केले आहे. मुस्लिम देशांनी आता एकत्र आले नाही, तर प्रत्येकाचे भवितव्य हेच होईल.”

त्यांनी इस्रायलशी राजनैतिक संबंध ठेवणाऱ्या मुस्लिम राष्ट्रांनी हे संबंध तोडावेत असेही सांगितले. तसेच इस्लामी सहकार्य संघटनेला (OIC) एक आपत्कालीन बैठक घेऊन संयुक्त रणनीती ठरवावी, असेही ते म्हणाले.

इस्रायल-इराणचे आण्विक धोरण काय आहे?

इस्रायलचे अण्वस्त्र धोरण रणनैतिक अस्पष्टतेवर आधारित आहे. म्हणजेच, इस्रायलने कधीही आपल्याकडे अण्वस्त्रे आहेत हे उघड मान्य केलेले नाही, मात्र जागतिक स्तरावर इस्रायलकडे अण्वस्त्र साठा असल्याचा विश्वास आहे.

त्याउलट, इराणचा अधिकृत दावा आहे की त्यांचा अणुकार्यक्रम हा पूर्णपणे शांततेसाठी – ऊर्जा निर्मिती आणि वैद्यकीय संशोधनासाठी आहे. इराण आण्विक अप्रसार कराराचा (NPT) सदस्य आहे आणि त्याने अण्वस्त्रे तयार करण्याचा इरादा नाही, असे सांगितले आहे.

पाश्चिमात्य देश आणि आंतरराष्ट्रीय आण्विक ऊर्जा संस्था (IAEA) मात्र इराणच्या अति-युरेनियम संवर्धन, क्षेपणास्त्र चाचण्या आणि पारदर्शकतेच्या अभावाबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. त्यामुळे इराणच्या अणुकार्यक्रमामागे लष्करी हेतू असण्याची शंका निर्माण झाली आहे.

Israel Iran nuclear tensions
Benjamin Netanyahu son wedding | इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी मुलाचे लग्न केले रद्द; आधी बंदिवानांना परत आणा – जनतेचा आक्रोश

पाकिस्तानची सावध भूमिका

इराणने पाकिस्तानच्या समर्थनाचा दावा करून इस्रायलवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला असला, तरी पाकिस्तानची अधिकृत भूमिका सावध असून, आण्विक युद्धाची धमकी फेटाळण्यात आली आहे. दरम्यान, मुस्लिम राष्ट्रांमध्ये इस्रायलविरोधात असंतोष उफाळून येत असून, त्याचा राजनैतिक आणि सुरक्षा परिणाम संपूर्ण पश्चिम आशिया भागावर पडण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news