Israel Iran conflict | जगातील सर्वात मोठ्या गॅस प्रकल्पावर इस्रायलचा बॉम्ब हल्ला; जागतिक तेल बाजार हादरला! पेट्रोल, गॅस महागणार...

Israel Iran conflict | भारतासारख्या ऊर्जा आयातदार देशांवर तात्काळ परिणामाची शक्यता
Israel Iran conflict
Israel Iran conflictPudhari
Published on
Updated on

Israel Iran conflict airstrike World's largest gas field attack South Pars Iran gas production halted Iran gas crisis oil and gas market

ऑनलाईन डेस्क : इस्रायल-इराण संघर्ष चिघळत चालला असून इस्रायलने शनिवारी इराणच्या बुशेहर प्रांतातील साउथ पार्स या जगातील सर्वात मोठ्या नैसर्गिक वायू क्षेत्रावर थेट हवाई हल्ला केला. या हल्ल्यामुळे प्रकल्पातील फेज 14 मध्ये मोठी आग लागली आणि 12 दशलक्ष घन मीटर (m³) गॅसचे उत्पादन थांबवावे लागले. ही कारवाई इस्रायलने इराणच्या उर्जा पायाभूत सुविधांवर केलेली पहिली थेट कारवाई आहे.

काय आहे साउथ पार्स गॅस फील्ड?

जागतिक स्तरावरील सर्वात मोठे नैसर्गिक वायू साठे: हे क्षेत्र इराण आणि कतार यांच्या सीमेवर आहे. कतारमध्ये हे "नॉर्थ फील्ड" म्हणून ओळखले जाते.

इराणच्या ऊर्जेचा कणा: इराणला सुमारे 66 टक्के गॅस इथून मिळतो, जो देशांतर्गत वीज निर्मिती, घरगुती वापर, व पेट्रोकेमिकल्ससाठी वापरला जातो.

वार्षिक उत्पादन: इराण दरवर्षी सुमारे 275 अब्ज घनमीटर वायू येथे तयार केला जातो, जो संपूर्ण जागतिक उत्पादनाच्या 6.5 टक्के इतका आहे.

निर्यातीवरील निर्बंध: आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे इराणचा बहुतांश वायू देशांतर्गतच वापरला जातो, जरी थोडीफार निर्यात इराकसारख्या देशांना होते.

Israel Iran conflict
Benjamin Netanyahu son wedding | इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी मुलाचे लग्न केले रद्द; आधी बंदिवानांना परत आणा – जनतेचा आक्रोश

हा हल्ला इतका महत्त्वाचा का आहे?

1. नवीन युद्धभूमी – ऊर्जा संरचनांवर हल्ला

इस्रायलचे आतापर्यंतचे हल्ले प्रामुख्याने इराणच्या लष्करी व अणु सुविधा केंद्रित होते. पण या वेळी त्यांनी इराणच्या आर्थिक जीवनरेषेवरच प्रहार केला आहे. "2019 मधील सौदी अरेबियाच्या अबकैक तेल प्रकल्पावर झालेल्या हल्ल्यानंतरचा हा सर्वात गंभीर हल्ला आहे," असे रिस्टॅड एनर्जीचे विश्लेषक जॉर्ज लिऑन म्हणाले.

2. जागतिक ऊर्जा पुरवठ्याला धोका

कतार हा मोठी LNG निर्यातदार देश आहे. त्याच्या भागावरही धोका निर्माण होऊ शकतो. हॉर्मुझ सामुद्रधुनीतून जगातील 21 टक्के LNG आणि 14 दशलक्ष बॅरल क्रूड दररोज नेले जाते. जर संघर्ष वाढला, तर कतार, इस्रायल तसेच अन्य आखाती देशांच्या उर्जा सुविधा देखील टार्गेट होऊ शकतात.

3. जागतिक बाजारपेठांवरील परिणाम

तेलाचे दर 14 टक्क्यांपर्यंत वाढले, सध्या प्रति बॅरल 73 डॉलरपर्यंत पोहोचले. इराणच्या खर्ग आयलंड व हॉर्मुझ सामुद्रधुनीवर हल्ला झाल्यास, तेल व गॅसच्या किमती गगनाला भिडू शकतात.

Israel Iran conflict
Shehbaz Sharif viral post | पाकिस्तानचे पंतप्रधान 'I condemn' ऐवजी 'I condom' म्हणाले? नेटवर प्रतिक्रिया, मीम्सचा पाऊस...

इराणची ऊर्जाव्यवस्था आधीपासूनच संकटात

इराणमधील उर्जाव्यवस्था आधीच संकटात असताना आता या बॉम्ब हल्ल्याने येथील पुरवठा साखळी आणखी विस्कळीत होणार आहे.

  • गॅस टंचाईमुळे वारंवार लोडशेडिंग आणि कारखाने बंद ठेवावे लागले.

  • इराण चेंबर ऑफ कॉमर्सनुसार, रोज सुमारे 250 दशलक्ष डॉलरचं नुकसान होते.

  • जुनी व ढासळलेली पायाभूत रचना आणि आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे दुरुस्ती खर्चिक व वेळखाऊ आहे.

  • "उर्जा सुविधा उध्वस्त केल्यास इराणसाठी मोठा धोका निर्माण होईल," असे उर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत

Israel Iran conflict
Pizza orders Pentagon | पेंटॅगॉनजवळील दुकानांतून पिझ्झाच्या मागणीत मोठी वाढ; हा ‘पिझ्झा इंडेक्स’ मानला जातो युद्धाचा संकेत...

युद्धाचा जागतिक परिणाम

  • युरोप आणि आशियात इंधन दरवाढ होऊन महागाई वाढू शकते.

  • भारतासारख्या ऊर्जा आयातदार देशांवर तात्काळ परिणाम होण्याची शक्यता.

  • व्यापारमार्ग, विमा खर्च, शिपिंग टाइम वाढणार — जागतिक पुरवठा साखळीवर दुष्परिणाम.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news