ISKCON chicken | इस्कॉन रेस्टॉरंटमध्ये तळलेलं चिकन खाल्लं! सोशल मीडियात संतापाचा उद्रेक, पाहा व्हिडीओ

ISKCON chicken | भाविकांना धक्का; शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंटमध्ये मांसाहार, कर्मचाऱ्यांनाही ऑफर केले चिकन
ISKCON chicken video viral
ISKCON chicken video viralPudhari
Published on
Updated on

ISKCON chicken video viral

लंडन : लंडनमधील ISKCON संस्थेच्या ‘गोविंदा’ या शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंटमध्ये एका व्यक्तीने केएफसीचं तळलेलं चिकन आणून उघडपणे खाल्ल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

या कृतीनंतर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत असून, अनेकांनी याला धार्मिक आणि सांस्कृतिक भावना दुखावण्याचा प्रकार ठरवत, संबंधित व्यक्तीविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे.

ISKCON chicken video viral
Saudi Sleeping Prince | सौदी अरेबियाच्या 'स्लीपिंग प्रिन्स'ने घेतला अखेरचा श्वास; 20 वर्षांपासून होता कोम्यात...

नेमकं काय घडलं?

व्हायरल व्हिडिओमध्ये एक कृष्णवर्णीय पुरुष रेस्टॉरंटमध्ये हातात केएफसीच्या चिकनचं पॅकेट घेऊन शिरतो. तिथल्या स्टाफला विचारतो, “हे व्हेगन रेस्टॉरंट आहे ना?” त्यावर स्टाफमधील महिला उत्तर देते, “हो, इथे मांस, कांदा, लसूण काहीच नाही.”

त्यानंतर तो व्यक्ती चिकन बाहेर काढतो, काऊंटरवर ठेवतो आणि थेट चिकन खायला सुरुवात करतो. त्याचे वर्तन पाहून कर्मचारी चकित होतात. त्यातील एक महिला त्याला तात्काळ बाहेर जाण्यास सांगते, तर दुसरी मदतीसाठी इतर कर्मचाऱ्यांकडे धाव घेते.

ISKCON chicken video viral
Tsunami Alert Russia | रशियात एका तासात 5 शक्तिशाली भूकंप; 7.4 तीव्रतेनंतर त्सुनामीचा इशारा

कर्मचाऱ्यांना विचारले- तुम्हाला हवंय का?

तो मात्र चिकन खाणं थांबवत नाही, उलटपक्षी कर्मचारी महिलेला “तुम्हाला हवंय का?” असं विचारत हातातलं अर्धवट खाल्लेलं चिकन पुढे करतो. नंतर दुसऱ्या कर्मचाऱ्याजवळ जाऊन पुन्हा चिकन त्याच्या तोंडातून दाखवत "तुमचं मांस नको आहे?" असं विचारतो.

ग्राहकांचाही संताप

घटनेदरम्यान उपस्थित असलेल्या एका ग्राहकाने स्पष्टपणे त्याला सुनावलं, “तुम्ही दुसऱ्यांच्या धार्मिक भावनांचा अपमान करत आहात. हे योग्य नाही.” यावर तो व्यक्ती जोरात ओरडतो, “Free the chicken!” आणि नंतर रेस्टॉरंटमधून बाहेर जातो.

ISKCON chicken video viral
MRI machine death | धक्कादायक! गळ्यातील साखळीने घेतला जीव; MRI मशिनमधील शक्तीशाली चुंबकाने घेतले खेचून, पत्नीसमोर पतीचा शेवट

सोशल मीडियात संतप्त प्रतिक्रिया

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

  • एका युजरने लिहिलं आहे की, “हा केवळ अपमान नाही, तर असहिष्णुतेचं उघड उदाहरण आहे.”

  • दुसऱ्याने लिहिलंय की, “याचं उद्दिष्ट काय होतं? हा शाकाहारी लोकांवर चिडलेला आहे का?”

  • तिसऱ्या युजरने त्याच्या कृतीला “घाणेरडं आणि विकृत वर्तन” असं म्हणत त्याला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, ही घटना केवळ एका व्यक्तीच्या अजब कृत्याची नाही, तर परधर्मीयांच्या श्रद्धा आणि संस्कृतीबद्दल असलेल्या असहिष्णुतेचं प्रतिबिंब आहे, असं अनेकांनी म्हटलं आहे.

ISKCON chicken video viral
Delta flight engine fire | विमानाच्या इंजिनाने हवेतच घेतला पेट; विमानात आणीबाणीची परिस्थिती, पाहा व्हिडिओ

भारतीय समुदायात नाराजी

अनेक भारतीय समुदायातील लोकांनी ISKCON संस्थेला पोलिसांत तक्रार करण्याचं आवाहन केलं आहे. लंडनमधील भारतीय व हिंदू समुदायामध्ये या प्रकारामुळे नाराजीचं वातावरण आहे.

धार्मिकस्थळांमधील शुद्धता आणि परंपरा पाळणं हे सर्वांच्या आचरणाचा भाग असायला हवे, असा ठाम सूर दिसून येतो आहे. या प्रकरणी काय कायदेशीर पावलं उचलली जातात याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news