MRI machine death | धक्कादायक! गळ्यातील साखळीने घेतला जीव; MRI मशिनमधील शक्तीशाली चुंबकाने घेतले खेचून, पत्नीसमोर पतीचा शेवट

MRI machine death | MRI मशीनच्या एका चुकीने गमवावा लागला जीव
MRI machine death
MRI machine deathपुढारी
Published on
Updated on

MRI machine death

वेस्टबरी, न्यू यॉर्क : न्यू यॉर्कमधील एका MRI केंद्रात घडलेली दुर्दैवी घटना संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राला हादरवून सोडणारी आहे. एका 61 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू MRI मशीनमध्ये अचानक ओढल्या गेल्याने झाला. या व्यक्तीने आपल्या गळ्यात वजनदार वजनप्रशिक्षणासाठी वापरली जाणारी धातूची साखळी परिधान केली होती.

नेमकं काय घडलं?

ही घटना बुधवारी दुपारी नासाउ ओपन MRI या केंद्रात घडली. या MRI मशिनमध्ये आधीच स्कॅनिंग सुरू असताना, संबंधित व्यक्तीने साखळी घालून आत प्रवेश केला. MRI मशीनमधील तीव्र चुंबकीय शक्तीमुळे ही साखळी जोरात मशिनकडे ओढली गेली आणि त्यामुळे ही व्यक्तीच मशिनमध्ये अडकली.

नासाउ काउंटी पोलिस विभागाच्या प्रसिद्धी पत्रकानुसार, संबंधित व्यक्तीचा गुरुवारी दुपारी मृत्यू झाला. मात्र, या वृत्ताच्या प्रसिद्धीपर्यंत (शनिवारपर्यंत), त्यांचे नाव अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेले नाही.

MRI machine death
Delta flight engine fire | विमानाच्या इंजिनाने हवेतच घेतला पेट; विमानात आणीबाणीची परिस्थिती, पाहा व्हिडिओ

पत्नीच्या समोरच दुर्घटना...

मृत व्यक्तीची पत्नी, एड्रिएन जोन्स-मॅकॅलिस्टर, हिने News 12 Long Island ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ती स्वतः MRI स्कॅनसाठी आत होती आणि गुडघ्याच्या दुखण्यावर तपासणी करत होती.

स्कॅन झाल्यावर तिला टेबलवरून खाली उतरायचे होते, म्हणून तिने तंत्रज्ञाला सांगून तिच्या पतीला आत बोलावून घेतले.

ती पुढे सांगते की, “मी त्याला हाक मारली. त्याने मला शेवटचा हात हलवून बाय केला आणि त्यानंतर लगेचच तो बेशुद्ध पडला.”

MRI machine death
Saudi Sleeping Prince | सौदी अरेबियाच्या 'स्लीपिंग प्रिन्स'ने घेतला अखेरचा श्वास; 20 वर्षांपासून होता कोम्यात...

MRI केंद्रांतील सुरक्षेचे काय?

ही घटना MRI केंद्रांतील सुरक्षिततेविषयी गंभीर प्रश्न निर्माण करणारी आहे. MRI मशीन हे अत्यंत तीव्र चुंबकीय क्षेत्र निर्माण करत असल्याने कोणतीही धातू जवळ नेणे अत्यंत धोकादायक ठरते. सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आणि रुग्णांना या नियमांची जाणीव असणे अत्यावश्यक आहे.

या प्रकरणाचा सध्या नासाउ काउंटी पोलीस तपास करत आहेत. तंत्रज्ञांची जबाबदारी, सुरक्षा प्रक्रियांचे पालन झाले किंवा नाही, याची चौकशी केली जात आहे. ही हृदयद्रावक घटना इतर MRI केंद्रांसाठीही एक गंभीर इशारा ठरावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

MRI machine death
China Brahmaputra Dam | ब्रह्मपुत्रा नदीवर चीनकडून जगातील सर्वात मोठ्या जलविद्युत प्रकल्पाच्या कामास प्रारंभ; भारत-बांग्लादेशला धोका

सुरक्षित MRI साठी महत्त्वाचे नियम

  • MRI कक्षात कोणतीही धातूची वस्तू नेऊ नये

  • वजनप्रशिक्षण उपकरणे, दागिने, धातूचे बटन/बेल्ट घालून प्रवेश टाळावा

  • तंत्रज्ञांनी प्रत्येक व्यक्तीची तपासणी करूनच त्यांना MRI कक्षात प्रवेश द्यावा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news