

Trump vs Musk : अवघ्या काही महिन्यांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांना जगातील सर्वोच्च नेते माननारे अब्जाधीश उद्योगपती एलन मस्क यांचे आता मतपरिवर्तन झाल्याचे दिसले. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांच्या प्रचारासाठी जीवाचे रान करणारे मस्क हेच आता त्यांच्या धोरणांचे प्रमुख टीकाकार बनले आहेत. गुरुवारी (दि. ५ जून) या दोघांमधील संघर्ष विकोपाला गेला. मस्क यांनी त्यांचे 'स्पेसएक्स' त्यांचे अंतराळ प्रकल्प बंद करण्याची घोषणा केली. दरम्यान, माध्यमांशी बाेलताना ट्रम्प यांनीही मस्क यांच्यावर ताेंडसुख घेतलं. दोघांमधील हा वाद सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून सुरू झाला. मात्र मस्क यांनी काही तासांतच त्यांनी यावर यू-टर्न घेत स्पष्ट केले की, “मी टीम अमेरिका सोबत आहे."
ट्रम्प आणि मस्क यांच्या संघर्षाचे मूळ कारण हे ट्रम्प सरकारने सादर केलेल्या नवीन कर विधेयक आहे. मस्क यांनी इशारा दिला की, ट्रम्प सरकारने सादर केलेल्या नवीन कर विधेयकामुळे अमेरिकेची यापूर्वीच असणारी प्रचंड अर्थसंकल्पीय तूट २.५ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढेल. यामुळे देशावरील अस्थिर कर्जाचा भार आणखी वाढेल. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मस्क यांनी अमेरिका सरकारच्या 'सरकारी कार्यक्षमता विभाग' ( डीओजीई ) च्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच नवीन कर विधेयकापासून स्वतःला दूर ठेवले आहे.
अमेरिकन सरकारशी थेट संघर्ष सुरू असताना, मस्क म्हणाले, 'माझे सरकारी करार रद्द करण्याच्या राष्ट्रपतींच्या विधानाच्या पार्श्वभूमीवर, स्पेसएक्स त्यांचे ड्रॅगन अंतराळयान ताबडतोब बंद करण्यास सुरुवात करेल. मात्र मस्क यांनी काही तासांतच त्यांनी यावर यू-टर्न घेतला आणि स्पष्ट केले की, “मी टीम अमेरिका सोबत असल्याचे स्पष्ट केले.
मस्क यांनी ट्रम्प यांचा वादग्रस्त ठरलेले अर्थतज्ज्ञ जेफ्री एपस्टीन यांच्याशी संबंध असल्याचा सर्वात धक्कादायक आरोप केला. 'आता खूप मोठा धमाका करण्याची वेळ आली आहे. ट्रम्प यांचं नाव एपस्टीन प्रकरणातील कागदपत्रांमध्ये आहे आणि म्हणूनच ती माहिती अजूनही गुप्त ठेवली जात आहे, असा आरोपही मस्क यांनी केला. काही दिवसांपूर्वीच मस्क यांनी सरकारी कार्यक्षमता विभागाच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर हा वाद अधिकच वैयक्तिक स्तरावर गेल्याचे स्पष्ट होत आहे.
एकीकडे आरोप-प्रत्यारोपाच्या फैर झडत असताना मस्क यांच्या कंपनीबरोबर अमेरिकन सरकारने केलेले सर्व करार तोडले जातील, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. ट्रम्प म्हणाले की, त्यांच्या सहकारी देशातील अब्जाधीशांना आर्थिक नुकसान पोहोचवण्यासाठी अमेरिकन सरकारचा वापर करतील. यावर मस्क यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आणि त्यांचा स्पेसएक्समधील 'ड्रॅगन' अंतराळयान वापरातून काढून घेण्याचा इशारा दिला. यामुळे अमेरिकेच्या अंतराळ कार्यक्रमांवर मोठा परिणाम होऊ शकतो.
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि अब्जाधीश एलोन मस्क एकमेकांशी वाद सुरु आहे. मस्क यांच्या कंपनी टेस्लाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. 'द हिल'च्या वृत्ताचा हवाला देत, एएनआयने वृत्त दिले आहे की गुरुवारी अमेरिकन शेअर बाजार बंद झाला तेव्हा टेस्लाच्या शेअर्समध्ये १४% घसरण झाली. सुमारे १५२ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले. त्यामुळे टेस्लाचे बाजारमूल्य ९०० अब्ज डॉलर्सवर आले. मस्क यांचे वैयक्तिक संपत्तीतून सुमारे ८.७३ अब्ज डॉलर्सची घट झाली आहे.
या संघर्षात मस्क यांनी पहिल्यांदाच राजकीय आघाडीवर उघडपणे विधान करत ट्रम्प यांच्या जागी जीडी व्हान्स यांना राष्ट्राध्यक्षपदासाठी प्रस्तावित केलं. X वरील एका पोस्टमध्ये उजव्या विचारसरणीचा प्रभावशाली व्यक्ती इयान चिओंग यांनी म्हटलं, “माझा विश्वास एलनवर आहे.” मस्क यांनी ही पोस्ट शेअर करून येस असे उत्तर दिले. मस्क यांनी ट्रम्प यांच्या जागतिक आयात कर धोरणावरही टीका करत म्हटलं की, या निर्णयामुळं वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत मंदी येईल. तसेच त्यांनी नवीन राजकीय पक्ष स्थापन करावा का, यावर एक ऑनलाइन मतदानही सुरू केलं.
जर्मनीचे चान्सेलर फ्रेडरिक मर्झ यांच्यासोबत ओव्हल ऑफिसमध्ये झालेल्या बैठकीदरम्यान, ट्रम्प यांना मस्क यांच्या टीकेबाबत विचारले असता त्यांनी सांगितले, “एलन आणि माझे चांगले संबंध होते; पण आता तसे राहतील का माहीत नाही.” ट्रम्प यांनी पुढे नाराजी व्यक्त करत सांगितले, “मी एलनला खूप मदत केली आहे. त्याला नवीन कर विधेयकाची पूर्ण माहिती होती, तरीही आता तो विरोध करत आहे.”
ट्रम्प यांनी केलला दावा खोडत काढत मस्क यांनी यावर तत्काळ उत्तर दिलं आणि ट्रम्प यांचा दावा खोटा असल्याचं सांगितलं. त्यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं की, “ नवीन कर विधेयक मला एकदाही दाखवले गेले नव्हते. एका रात्रीत ते मंजूर करण्यात आलं. संसदेतील बहुतांश खासदारांना ते वाचायलाही मिळालं नाही. माझ्याशिवाय ट्रम्प निवडणूक हरले असते. पण त्यांनी फारच कृतघ्नपणा केला आहे, असेही मस्क यांनी म्हटलं आहे.
ट्रुथ सोशलवरील पोस्टमध्ये ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, मस्क माझ्या विरोधात गेल्याने मला कोणतीही अडचण नाही, परंतु त्याने हे काही महिन्यांपूर्वीच करायला हवे होते. नवीन कर विधेयक अमेरिकेच्या संसदेतील सर्वोत्तम विधेयक आहे. $1.6 ट्रिलियन खर्च कपात आणि इतिहासातील सर्वात मोठी कर सवलत दिली आहे. हे विधेयक मंजूर झालं नाही, तर ६८% करवाढ होईल. हा निर्णय आपल्या देशाला महानतेच्या मार्गावर घेऊन जाणार आहे, असा दावाही ट्रम्प यांनी केला आहे.
'द हिल'च्या रिपाेर्टनुसार, मस्क ज्या प्रकरणाचा उल्लेख करत आहेत ते लैंगिक गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेल्या फायनान्सर जेफ्री एपस्टाईनशी संबंधित आहे. २०१९ मध्ये मॅनहॅटन तुरुंगात त्याने जीवन संपवले होते. यापूर्वी त्याने अनेक बड्या लोकांची नावे सांगितली होती. ट्रम्प व्यतिरिक्त, या लोकांमध्ये प्रिन्स अँड्र्यू आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन सारख्या व्यक्तींचा समावेश आहे. या दिग्गजांची नावे एपस्टाईन यांच्यावर अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या लैंगिक शोषणाच्या खटल्याशी संबंधित न्यायालयीन कागदपत्रांमध्ये नमूद आहेत. नोव्हेंबर २०२४ मध्ये राष्ट्रपती निवडणुकीच्या अगदी आधी, वाद वाढत असताना, ट्रम्प म्हणाले होते की, एपस्टाईनशी संबंधित फायली सार्वजनिक करण्यात त्यांना "कोणतीही अडचण" येणार नाही. एपस्टाईनच्या मृत्यूनंतर काही खासदारांनी सोशल मीडियावरही अशी मागणी केली होती. ट्रम्प यांनी एपस्टाईन याच्याशी संबंध नाही, असा दावाही त्यांनी केला होता. तथापि, या प्रकरणाची कागदपत्रे त्यांनी अद्याप सार्वजनिक केलेली नाहीत.