पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेतील सत्तांतरानंतर नूतन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरच जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून ओळखले जाणारे एलन मस्क ( Elon Musk ) ही चर्चेत आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत त्यांनी ट्रम्प यांचा प्रचार केला. यानंतर आता नूतन सरकारच्या वतीने राबविण्यात येणार्या धोरणांमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे स्पष्ट होत आहे. आता मस्क पुन्हा एकदा चर्चे आले आहेत. मात्र यावेळी कारण थोडे वेगळले आहे. अमेरिकेतील सोशल मीडिया 'इन्फ्लुएन्सर' मस्क यांच्या मुलाला ५ महिन्यांपूर्वी जन्म दिला असल्याचा दावा केला आहे. तिने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच केलेल्या दाव्याने अमेरिकेत खळबळ उडाली आहे.
३१ वर्षी अॅशले सेंट क्लेअरने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मस्क यांच्या मालकीचा सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट केली आहे. यामध्ये तिने म्हटलं आहे की, ५ महिन्यांपूर्वी मी या जगात एका बाळाचे स्वागत केले. त्याचे वडील एलन मस्क आहेत. मला माझ्या मुलाच्या गोपनीयतेची आणि सुरक्षिततेची काळजी होती. म्हणूनच मी ही गोष्ट आधी उघड केले नाही; पण अलिकडेच टॅब्लॉइड मीडिया ही बाब उघड करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना मला होणार्या नुकसानाची पर्वा नाही. मला माझ्या मुलाला सामान्य आणि सुरक्षित वातावरणात वाढताना पहायचे आहे. आम्ही माध्यमांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या मुलाच्या गोपनीयतेचा आदर करावा." दरम्यान, ॲशले सेंट क्लेअर ही सोशल मीडियावर उजव्या विचारसरणीची समर्थक म्हणून ओळखली जाते. तसेच ती नेहमीच वादग्रस्त विधानांवरुनही चर्चेत राहते. आता तिने केलेल्या दाव्यावर मस्क यांच्या खुलाशाकडे अमेरिकेचे लक्ष लागले आहे.
एका रिपोर्टनुसार, एलन मस्क यांचे तीन विवाह झाले आहेत. त्यांना १२ मुले आहेत. त्यांना त्यांची पहिली पत्नी जस्टिनपासून त्याला ६ मुले होती. संगीतकाराला ग्रिम्सपासून तीन मुले आहेत आणि न्यूरालिंकचे माजी ऑपरेशन्स डायरेक्टर शिवोन गिलिसपासून तीन मुले आहेत. आता अमेरिकेतील सोशल मीडिया 'इन्फ्लुएन्सर' अॅशले सेंट क्लेअर हिने केलेल्या दाव्याने सोशल मीडियावरील खळबळ माजली आहे.