ट्रम्‍प यांच्‍या प्रचार सभेत मस्‍क 'नाचले'! म्‍हणाले,"संविधानाचे रक्षण..."

रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराला मतदानाचेही केले आवाहन
Elon Musk
माजी राष्‍ट्राध्‍यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्‍ड ट्रम्‍प यांची पेनसिल्‍व्‍हेनियालामधील बटलर येथे झालेल्‍या निवडणूक प्रचार सभेत जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आणि टेस्ला कंपनीचे प्रमुख एलॉन मस्‍क यांनी हजेरी लावली.(Representative image)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अमेरिकेतील राष्‍ट्राध्‍यक्ष निवडणूक प्रचार आता शिगेला पोहचला आहे. रविवारी (दि. ६) माजी राष्‍ट्राध्‍यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्‍ड ट्रम्‍प यांची पेनसिल्‍व्‍हेनियालामधील बटलर येथे झालेल्‍या निवडणूक प्रचार सभेत जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आणि टेस्ला कंपनीचे प्रमुख एलॉन मस्‍क ( Elon Musk ) यांनी हजेरी लावली. या सभेत ते नाचे आणि , 'संविधानाचे रक्षण करण्यासाठी रिपब्‍लिकन पक्षाला मतदान करा, असे आवाहनही त्‍यांनी केले.

लोकशाही टिकवण्यासाठी ट्रम्प यांचा विजय आवश्यक

ट्रम्प यांच्यावर पेनसिल्‍व्‍हेनियामध्‍येच गोळीबार झाला होता. त्‍यामुळे याच ठिकाणी पुन्‍हा होणारी त्‍यांची सभा चर्चेच्‍या केंद्रस्‍थानी होती. या बहुचर्चित सभेत डोनाल्‍ड ट्रम्‍प यांनी इलॉन मस्क यांचे मंचावर स्वागत केले. यावेळी मस्‍क हे नाचतानाही दिसले. 'मतदान करा! मत द्या! मत द्या! लढा! लढा! लढा!, असे आवाहनही त्‍यांनी यावेळी केली. मस्क म्हणाले, 'अमेरिकेतील संविधान आणि लोकशाही टिकवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा विजय आवश्यक आहे.' डोनाल्ड ट्रम्पचे कौतुक करताना त्यांनी डेमोक्रॅटिक पक्ष आणि विद्यमान अध्यक्ष जो बायडेन यांच्‍यावर टीकेची तोफ डागली.

असे अध्यक्ष जे पायऱ्या चढू शकत नाहीत : बायडेन यांना टाेला

राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्‍यावर टीका करताना एलॉन मस्क म्हणाले की, 'आमच्याकडे असे अध्यक्ष आहेत जे पायऱ्या चढू शकत नाहीत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा १० ऑक्टोबरपासून डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्या प्रचार कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. निवडणुकीच्या दिवशी ओबामा हॅरिसला त्यांच्या प्रचारात मदत करतील. त्यांची भाषणे प्रमुख राज्यांमध्ये नियोजित आहेत, मेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक ५ नोव्हेंबरला होणार आहे.

ट्रम्‍प निवडणूक जिंकल्‍यास मस्‍क यांना कोणते पद मिळणार?

निवडणूक जिंकलो तर मस्क यांच्या नेतृत्वाखाली सरकारी कार्यक्षमता आयोग स्थापन करतील, ज्याचे काम आर्थिक बाबींवर लक्ष ठेवणे हे असेल, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील महिन्‍यात जाहीर केले आहे. एलॉन मस्क डोनाल्ड ट्रम्प यांना उघडपणे पाठिंबा देत आहेत. त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रम्प यांची मुलाखत असो दरम्यान, रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इलॉन मस्क यांच्यासाठी मोठी घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यास मस्क यांच्या अध्यक्षतेखाली सरकारी कार्यक्षमता आयोग स्थापन करू, असे म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news