Trump On Iran Israel US War: युद्ध लवकरच संपणार... डोनाल्ड ट्रम्प इराणला इशारा देत नेमकं काय म्हणाले?

Trump On Iran Israel US War
Trump On Iran Israel US Warpudhari
Published on
Updated on

Trump On Iran Israel US War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज (दि. १० मार्च) इराणसोबत सुरू असलेल्या युद्धाबाबत मोठं भाष्य केलं. त्यांनी हे युद्ध लवकरच संपणार आहे असं म्हणाले. मात्र त्यांनी यासाठी कोणतीही डेटलाईन दिलेली नाही. याचबरोबर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणनं जर काही क्युट (आगळीक) करण्याचा प्रयत्न केला नाही तर युद्ध लवकरच संपेल. युएस लवकरच हे युद्ध संपवेल असं सांगितलं. त्यांनी इराण युद्ध हे एक छोटी ट्रीप होती अशी देखील शेखी मिरवली.

Trump On Iran Israel US War
Iran attacks | इराणचे हल्ले तीव्र; आखाती देशांतून तेलपुरवठा विस्कळीत

पत्राकर परिषदेत काय म्हणाले ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प फ्लोरिडामध्ये पत्रकार परिषदेत म्हणाले, 'हे सर्व लवकरच संपणार आहे. जर त्यांनी पुन्हा सुरू केलं तर आम्ही यापेक्षा जास्त भीषण हल्ला करू. आम्ही आता कुठं एक छोटी ट्रीप केली. आम्हाला असं करावं लागलं कारण काही लोकांपासून आम्हाला सुटका हवी होती. मला असं वाटतं की तुम्ही ही एक छोटीच ट्रीप होती हे पाहू शकाल.'

डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी सीबीएस मुलाखतीत म्हणाले होते की हे युद्ध जवळपास संपलं आहे. याचबरोबर त्यांनी इराणनं काही आगळीक केली तर त्याचे परिणाम वाईट होतील असा इशारा देखील दिला.

ट्रम्प पुढे म्हणाले, त्यांना ज्याचा काही मारा करायचा होता त्यांच्याकडे जेवढं होतं तेवढं त्यांनी शूट केलं आहे. आता त्यांनी फार काही आगळीक करू नये. ती कृती त्यांच्या देशासाठी शेवट ठरू शकतो. जर तुम्ही काही वाईट केलं तर ते इराणसाठी शेवट असेल. तुम्ही परत इराणचं नाव ऐकू शकणार नाही.'

Trump On Iran Israel US War
Israeli Firing | इस्रायली सैन्याचा गाझातील मदत केंद्राजवळ गोळीबार; २१ ठार, ११५ जखमी

युद्ध जवळपास संपलं आहे

ते पुढे म्हणाले, 'मला वाटतं की युद्ध संपलं आहे, जवळपास संपलं आहे. त्यांच्याकडे नौदल नाही, संपर्क यंत्रणा नाही, त्यांच्याकडे हवाई दल नाही.' जरी ट्रम्प यांनी युएस आणि सहकारी देश जिंकल्याचं जाहीर केलं असलं तरी हे पुरेसं नाही. त्यामुळं आम्ही त्याच्याही पुढं जात संपूर्ण विजय मिळवण्यासाठी प्रतिबद्ध आहे असं सांगितलं.

ट्रम्प यांनी दावा केला की, 'आम्ही अनेक अर्थानं जिंकलो आहोत. मात्र हा विजय पुरेसा नाही. आम्ही संपूर्ण विजय मिळवण्यासाठी पुढं जाणार आहे. आम्ही खूप दिवसांपासून असलेला हा धोका आता कायमचा संपवणार आहोत. मानवी इतिहासातील अमेरिका हा देशा महान आणि अद्वितीय असा देश आहे. आम्हाला दैत्य दहशतवादी आणि अविचारी धमकवू शकणार नाहीत.'

Trump On Iran Israel US War
US Iran War | रक्तरंजित संघर्षाचा दहावा दिवस..! युद्धासाठी अमेरिका दररोज किती अब्ज डॉलर्सचा चुराडा करतोय?

इराणनंच सुरूवात केली

जर तेहराननं हल्ल्याची सुरूवात केली नसती तर युएस आणि इस्त्रायल यांनी इराणवर हल्ला केला नसता असं अजब वक्तव्य देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं. 'जर आम्ही आत घुसलो नसतो तर ते आमच्यावर हल्ला करण्यासाठी आले असते. एका आठवड्यात हे झालं असतं. त्यांनी शंभर टक्के आमच्यावर हल्ला केला असता. ते त्यासाठी तयार होते. कोणी विचार केला नसेल त्यापेक्षा त्यांच्याकडे जास्त क्षेपणास्त्रे होती.'

'त्यांनी संपूर्ण मध्य पूर्व आशिया आणि इस्त्रायलवर हल्ला केला असता. जर त्यांच्याकडे अणुबॉम्ब असता तर त्यांनी तो इस्त्रायलवर टाकला असता. तो एक मोठा हल्ला ठरला असता. त्यांच्याकडे सगळी मिसाईल आणि लाँचर्स होते त्यातील ८० टक्के मिसाईल आणि लाँचर्सपासून आम्ही आमची सुटका केली आहे आता त्यांच्याकडे फार कमी लाँचर्स आहेत. आमच्या लष्कारानं अद्वितीय कामगिरी केली आहे.'

Trump On Iran Israel US War
Crude oil | कच्चे तेल दरही भडकले

डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी हा संघर्ष थांबवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे इराणची बिनशर्त शरणागती. डोनाल्ड ट्रम्प यांनी आता नुकतीच जी वक्तव्ये केली आहेत. ती वक्तव्ये ज्यावेळी पेंटगॉनने सोशल मीडियावर अमेरिकेनं आता कुठं लढायला सुरूवात केली आहे अशी पोस्ट केल्यानंतर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news