Israeli Firing | इस्रायली सैन्याचा गाझातील मदत केंद्राजवळ गोळीबार; २१ ठार, ११५ जखमी

मदत साहित्य घेण्यासाठी जाणार्‍या पॅलेस्‍टिनी नागरिकांचा मृत्‍यू
Israeli Firing
File Photo
Published on
Updated on

गाझाच्या रफाह शहरातील एका अमेरिकन मदत केंद्राजवळ इस्रायली सैन्याने जमावावर रविवारी (दि. १ जून) गोळीबार केला. यामध्‍ये मदतीसाठी गेलेल्या किमान २१ पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले तर १७५ हून अधिक जखमी झाले आहेत, असे वृत्त 'एपी'ने दिले आहे. दरम्‍यान, या हल्‍ल्‍याबाबत इस्रायली सैन्याने कोणतीही टिप्पणी केलेली नाही.

अचानक इस्रायली सैन्याने केला गोळीबार

गाझा पट्टीमध्ये रेड क्रॉसद्वारे चालवल्या जाणाऱ्या संस्‍थेमधून मदत साहित्य घेण्यासाठी पॅलेस्टिनी नागरिक जात होते. यावेळी अचानक इस्रायली सैन्याने जमावावर गोळीबार केला. प्रचंड अफरातफरी माजली. रेड क्रॉसद्वारे चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयाच्‍या सूत्रांनी सांगितले की, या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले आहेत. १७५ लोक जखमी देखील झाले आहेत. गाझा ह्युमॅनिटेरियन फाउंडेशनकडून मदत साहित्य वाटप करताना गोंधळ उडाला आहे. अनेक प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे की इस्रायली सैनिकांनी मदत वितरण स्थळांजवळील गर्दीवर गोळीबार केला.

Israeli Firing
गाझा येथे इस्‍त्रायलच्या हल्‍ल्‍यात पाच पत्रकार ठार

हमास म्‍हणतयं, कायमस्वरूपी युद्धबंदीची गरज

अमेरिकेने पाठिंबा दिलेल्या युद्धबंदी प्रस्तावावर हमासने प्रतिक्रिया दिल्यानंतर काही तासांतच ही मोठा हल्‍ला झाला आहे. हमासच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गटाचे उत्तर सकारात्मक असल्याचे वर्णन केले, तर अमेरिकेचे राजदूत स्टीव्ह विटकॉफ यांनी ते "पूर्णपणे अस्वीकार्य" म्हणून फेटाळून लावले. हमासने म्हटले आहे की, आम्‍ही कायमस्वरूपी युद्धबंदीची गरज अधोरेखित केली आहे. पॅलेस्टिनी गटाच्या राजकीय ब्युरोने म्हटले आहे की त्यांनी गाझा पट्टीतून "पूर्ण इस्रायली माघार" घेण्याचा आग्रह धरला आहे. शुक्रवारी, इस्रायलने हमासला हा करार स्वीकारण्याचा आणि गाझामध्ये ठेवलेल्या ओलिसांचा नायनाट करण्याचा इशारा दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news