Donald Trump Dance: गाणं वाजताच ट्रम्प थिरकले! चीनमध्ये केला सिग्नेचर डान्स; शी जिनपिंगही पाहत राहिले, VIDEO होतोय व्हायरल

Donald Trump YMCA Dance VIDEO: ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारातील लोकप्रिय गाण्यामुळे त्यांची खास डान्स स्टाइल पुन्हा चर्चेत आली आहे.
Donald Trump YMCA Dance VIDEO
Donald Trump YMCA Dance VIDEOPudhari
Published on: 
Updated on: 

Donald Trump YMCA Dance VIDEO: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या अनोख्या डान्स स्टाइलसाठीही ओळखले जातात. आता चीन दौऱ्यादरम्यान त्यांचा असाच एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. चीनमधील शेनझेन येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात ‘Y.M.C.A.’ हे गाणे वाजताच ट्रम्प यांचा उत्साह पाहायला मिळाला. त्यांच्या निवडणूक प्रचारात लोकप्रिय ठरलेल्या या गाण्यावर कलाकारांनी सादरीकरण केले. विशेष म्हणजे, यावेळी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हेही ट्रम्प यांच्यासोबत उपस्थित होते.

आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य (APEC) बैठकीची सांगता गुरुवारी, 19 नोव्हेंबर रोजी झाली. त्यानंतर व्हाइट हाऊसमधील विशेष सहाय्यक आणि कम्युनिकेशन सल्लागार मार्गो मार्टिन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर 18 सेकंदांचा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये ट्रम्प आणि शी जिनपिंग एकाच टेबलवर बसलेले दिसत आहेत. दोघेही मंचावर सुरू असलेला ‘Y.M.C.A.’ गाण्याचा कार्यक्रम पाहताना दिसतात.

व्हिडिओमध्ये 20 हून अधिक चिनी कलाकार रंगीबेरंगी कपडे परिधान करून गाण्यावर नृत्य करताना दिसत आहेत. त्यांच्या मागे असलेल्या मोठ्या स्क्रीनवर याच वर्षी सप्टेंबरमध्ये वॉशिंग्टन येथे ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्या झालेल्या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ दाखवण्यात आले.

Donald Trump YMCA Dance VIDEO
Gold Silver Price Today: खरेदीदारांसाठी मोठी संधी! 18 कॅरेट सोनं 1 लाखांच्या खाली, चांदीही झाली स्वस्त, पाहा आजचे दर

ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारातील लोकप्रिय गाणे

‘Y.M.C.A.’ हे गाणे डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचाराचा महत्त्वाचा भाग राहिले आहे. प्रचारसभांमध्ये हे गाणे वाजल्यानंतर ट्रम्प अनेकदा आपल्या खास डान्स स्टाइलमध्ये थिरकताना दिसले आहेत. दोन्ही हातांच्या मुठी बंद करून विशिष्ट पद्धतीने केलेला त्यांचा डान्स सोशल मीडियावरही चांगलाच लोकप्रिय झाला आहे.

Donald Trump YMCA Dance VIDEO
Children Bank of India Fake Currency: 'चिल्ड्रन बँके’च्या बनावट नोटा देऊन व्यापाऱ्याला ४० लाखांचा गंडा; पोलिसांनी असा केला पर्दाफाश

विशेष म्हणजे, यापूर्वीही चीनमध्ये ट्रम्प यांच्यासाठी ‘Y.M.C.A.’ हे गाणे वाजवण्यात आले होते. याच वर्षी मे महिन्यात झालेल्या चीन दौऱ्यादरम्यान शी जिनपिंग यांनी ट्रम्प यांच्यासाठी विशेष शाही भोजनाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमाच्या शेवटीही हेच गाणे वाजवण्यात आले होते. त्यामुळे चीनमधील कार्यक्रमात पुन्हा एकदा हे गाणे ऐकायला मिळाल्याने ट्रम्प यांचा खास डान्स चर्चेत आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.