Gold Silver Price Today: खरेदीदारांसाठी मोठी संधी! 18 कॅरेट सोनं 1 लाखांच्या खाली, चांदीही झाली स्वस्त, पाहा आजचे दर

Gold Silver Price Today: चांदीही गेल्या 10 दिवसांत किलोमागे 25,100 रुपयांनी स्वस्त झाली असून सध्या तिचा भाव 1,74,900 रुपये आहे.
Gold Silver Price Today
Gold Silver Price TodayPudhari
Published on: 
Updated on: 

Gold Silver Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. डॉलरची वाढती ताकद आणि अमेरिकेच्या ट्रेझरी बाँडचे वाढलेले व्याजदर यामुळे सोन्याच्या किमतीवर दबाव निर्माण झाला आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, 18 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव आता एक लाख रुपयांच्या खाली आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. सलग सहा दिवसांच्या घसरणीत 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव तब्बल 12,060 रुपयांनी कमी झाला आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 11,060 रुपयांची घट झाली आहे.

आज राजधानी दिल्लीतही सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. 24 कॅरेट आणि 22 कॅरेट अशा दोन्ही प्रकारच्या सोन्याच्या 10 ग्रॅमच्या दरात प्रत्येकी 10 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे लग्नसराईसाठी किंवा दागिने खरेदीसाठी सोने घेण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळू शकतो.

Gold Silver Price Today
Employees Become Millionaires: कंपनी असावी तर अशी! 5,100 कर्मचारी रातोरात कोट्यधीश; अनेकांच्या संपत्तीत 930 कोटींची भर, असं काय घडलं?

दिल्ली आणि मुंबईतील सोन्याचे आजचे दर

देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर वेगवेगळे आहेत. मनीकंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली आणि मुंबईतील 10 ग्रॅम सोन्याचे दर पुढीलप्रमाणे आहेत.

दिल्ली

  • 24 कॅरेट सोने (10 ग्रॅम) : 1,25,710 रुपये

  • 22 कॅरेट सोने (10 ग्रॅम) : 1,15,240 रुपये

  • 18 कॅरेट सोने (10 ग्रॅम) : 94,320 रुपये

मुंबई

  • 24 कॅरेट सोने (10 ग्रॅम) : 1,25,560 रुपये

  • 22 कॅरेट सोने (10 ग्रॅम) : 1,15,090 रुपये

  • 18 कॅरेट सोने (10 ग्रॅम) : 94,170 रुपये

पुणे

  • 24 कॅरेट सोने (10 ग्रॅम) : 1,25,560 रुपये

  • 22 कॅरेट सोने (10 ग्रॅम) : 1,15,090 रुपये

  • 18 कॅरेट सोने (10 ग्रॅम) : 94,170 रुपये

Gold Silver Price Today
Children Bank of India Fake Currency: 'चिल्ड्रन बँके’च्या बनावट नोटा देऊन व्यापाऱ्याला ४० लाखांचा गंडा; पोलिसांनी असा केला पर्दाफाश

चांदीच्या दरातही मोठी घसरण

सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही घसरण सुरू आहे. औद्योगिक क्षेत्रातून चांदीची मागणी कमी झाल्याचा परिणाम किमतीवर होत आहे. गेल्या 10 दिवसांत एक किलो चांदीचा भाव तब्बल 25,100 रुपयांनी घसरला आहे.

विशेष म्हणजे, या कालावधीत चार दिवस चांदीच्या दरात कोणताही बदल झाला नव्हता. मात्र, उर्वरित दिवसांतील घसरणीमुळे चांदीच्या किमतीत मोठी घट झाली आहे. आज चांदीच्या दरात 100 रुपयांची घसरण झाली आहे.

सध्या दिल्लीत एक किलो चांदीचा भाव 1,74,900 रुपये आहे. मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या प्रमुख शहरांमध्येही चांदी याच दराने विकली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.