

Donald Trump On alice huang: Nvidia चे माजी सीईओ जेनसन हुआंग यांचे चीनच्या एका महिलेसोबत अफेअर असल्याची बाब समोर आली होती. ही चायनिज गुप्तहेर असल्याचा देखील संशय व्यक्त केला गेला. या प्रकरणात जेनसन हुआंग यांना आपल्या सीईओ पदाचा राजीनामा देखील द्यावा लागाला होता. आता याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.
राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते एलिस हुआंग या गुप्तहेर असल्याचा दावा चुकीचा असून त्या फक्त एक चीप व्यावसायिक आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिंगपिंग यांच्यासोबत चर्चा करणाता जेनसन हुआंगच्या परिस्थितीचा उल्लेख काही काळासाठी झाला होता. एलिस हुआंग या गुप्तहेर असल्याच्या शंकेबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून येणाऱ्या प्रत्येक सुंदर महिलेला गुप्तहेर मानलं जातं असं वक्तव्य केलं.
बुधावारी फॉक्स न्यूजच्या 'द इंग्राहम अँगल' नावाच्या कार्यक्रमात ट्रम्प म्हणाले, 'आम्ही यावर (जेनसन हुआंग प्रकरण) चर्चा केली नाही. मी याचा उल्लेख फक्त काही काळासाठी केला असेल. कारण ती एक मोठी ट्रॅजिडी आहे. ते एक गुणवान व्यक्ती आहेत.'
ट्रम्प यांना एलिस हुआंग आणि जेनसन यांचे अफेअर हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका आहे का असं विचारलं असता त्यांनी मी काही असं ऐकलेलं नाही. त्या गुप्तहेर आहेत असं मी काही ऐकलेलं नाही. त्या एक महिला होत्या. त्या सुंदर महिला आहेत आणि चीनमधून येणाऱ्या कर्व सुंदर महिलांना गुप्तहेर समजलं जातं. मी एलिस या गुप्तहेर असल्याचं ऐकलं नाही. त्या एक उद्योगी महिला असून त्या चीप्स खरेदीदार होत्या.
ट्रम्प यांनी यावेळी शी जिंगपिंग यांच्यासोबत डिनरवेळी झालेल्या संभाषणाबाबत देखील सांगितलं. त्यावेळी त्यांनी आम्ही पूर्ण संध्याकाळ गप्पा मारल्या आम्ही AI बाबत देखील चर्चा केल्याचं सांगितलं.
एनवीडियाचे माजी सीईओ जेनसन हुआंग यांनी त्यांचे चीनी महिला एलिसशी विवाहबाह्य संबंध असल्याचं मान्य केलं. त्यांनी यानंतर आपल्या पदाचा राजीनामा देखील दिला. ट्रम्प यांनी त्यांना जॉब न सोडण्याचा कल्ला देखील दिला होता.