

मंगोलियाच्या सीमेजवळ तैनात
शस्त्र नियंत्रणाच्या चर्चेत कोणताही रस नाही
टार्गेटबाबत कोणताही खुलासा नाही
चीनने रिपोर्टमधील दावे फेटाळले
China Nuclear Expansion missile: अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयानं चीनच्या लष्करी महत्वकांक्षा उजेडात रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. या रिपोर्टमध्ये चीनची लष्करी ताकद वाढवण्याची महत्वकांक्षा दिवसेंदिवस गंभीर होत चालली असल्याचे समोर आले आहे. चीनला अण्विक शस्त्रे नियंत्रित करण्याबाबत चर्चा करण्यात कोणताही रस नाहीये. या रिपोर्टमध्ये चीनने काही अज्ञात स्थळी आंतरखंडीय बॅलेस्टिक मिसाईल (ICBC) तैनात केली आहेत असा देखील दावा करण्यात आला आहे.
पेंटागॉनने यापूर्वीही चीनच्या अज्ञात स्थळावरील लष्करी हालचालीबाबत खुसाला केला होता. त्यावेळी तैनात करण्यात आलेल्या मिसाईलबाबत कोणतीही आकडेवारी दिली नव्हती. पेंटागॉनने आपल्या ड्राफ्ट रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार ही क्षेपणास्त्रे मंगोलियाच्या सीमेजवळ तीन अज्ञात ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत. ही क्षेपणास्त्रे सॉलिड फ्युअल असणार आहे डीएफ ३१ या क्षेणीतील असल्याचं सांगितलं जात आहे.
शिकागो मधील बुलेटिन ऑफ द अॅटोमिक सायन्टिस्ट एका एनजीओने दिलेल्या माहितीनुसार अण्विक शस्त्रांनी संपन्न असलेल्या देशांच्या तुलनेत चीन आपल्या शस्त्रांचा साठा आणि आधुनिकीकरण सर्वात वेगानं करत आहे. तर पेंटागॉनच्या नुकत्यात रिलीज झालेल्या रिपोर्टमध्ये बिजिंगकडून अण्वस्त्र निरस्त्रीकरण किंवा शस्त्र नियंत्रण याबाबत चर्चेसाठी कोणताही रस दाखवला जात नाहीये.
पेंटागॉनच्या रिपोर्टनुसार चीनकडून तैनात करण्यात आलेल्या क्षेपणांस्त्रांचा उल्लेख करण्यात आला आहे. याचे लोकेशन देखील सांगण्यात आलं आहे. मात्र या रिपोर्टमध्ये चीनच्या या क्षेपणास्त्रांचे टार्गेट काय आहे याचा मात्र उल्लेख करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे हा रिपोर्ट संसदेत सादर होणार आहे.
मात्र हा अजून ड्राफ्ट रिपोर्ट आहे आणि संसदेत सादर होण्यापूर्वी यात बदल देखील होऊ शकतात. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प सतत सांगत आहेत की चीन आणि रशियासोबत अण्वस्त्र निरस्त्रीकरण हे त्यांचे टार्गेट आहे.
पेंटागॉनचा हा ड्राफ्ट रिपोर्ट चीनने फेटाळून लावला आहे. चीनने हा आमची बदनामी करण्याचा डाव असल्याचे सांगितलं. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न असल्याचं देखील चीननं म्हटलं आहे. अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या रिपोर्टचा हा ड्राफ्ट चीनने व्हेन्युजएलाच्या समर्थनार्थ वक्तव्य केल्यानंतर आला आहे.