

Donald Trump Photo: अमेरिकेच्या न्याय विभागानं अखेर जेफ्री एप्स्टीन फाईल्स मधील राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो प्रसिद्ध केला आहे. नुकत्याच रिलीज करण्यात आलेल्या बॅचमधून ट्रम्प यांचा तो फोटो वगळण्यात आला होता. मात्र जोरदार टीका होऊ लागल्यावर जस्टिस विभागानं तो फोट पुन्हा रिस्टोर केला आहे. जस्टीन एप्स्टीन यांच्या डेस्कवर डोनाल्ड ट्रम्प यांचे दोन फोटो ठेवण्यात आले होते.
पहिल्या फोटोत डोनाल्ड ट्रम्प हे काही महिलांच्या समुहासोबत उभारल्याचे दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोत डोनाल्ड ट्रम्प, त्यांची पत्नी मेलनिया, जस्टीन एप्स्टीन आणि एप्स्टीन यांची मैत्रिण गिस्लाने मॅक्सवेल दिसत आहेत. या लेटेस्ट बॅचमध्ये डोनाल्ड ट्रम्प हे माजी राष्ट्रपती ब्लीन क्लिंटन आणि पोप जॉन पॉल २ यांच्याशी असभ्य वर्तन करताना दिसत आहेत.
दरम्यान, न्याय विभागानं हे पीडितांची ओळख गुप्त ठेवण्याच्या उद्येशानं काढून टाकले होते असे स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र ज्यावेळी सोशल मीडियावर यावरून रणकंदन माजलं त्यानंतर न्याय विभागानं हे फोटो पुन्हा रिस्टोर केले आहेत. याबाबतची स्पष्टीकरण देणारी पोस्ट न्याय विभागानं एक्स प्लॅटफॉर्मवर केली आहे.
न्याय विभागानं या एप्स्टिन फाईल कागदपत्रामधील जवळपास १६ फाईल्स या हटवल्या असल्याचं सांगण्यात येत आहे. अनेक कागदपत्रे ही काळ्या रंगाने रंगवली होती. यानंतर विरोधी पक्षानं न्याय विभागावर टीका केली. ट्रम्प हे एप्स्टीन फाईल्स जगासमोर ठेवण्यात याव्या या कायद्याचे सरळ सरळ उल्लंघन करत आहेत अशी टीका झाली.
काँग्रेसमन जेमी रस्कीन यांनी सांगितलं की, 'ही सगळी लपवाछपवी सुरू आहे. याचं कोणतंही कारण असेल. डोनाल्ड ट्रम्प हे सार्वजनिक करू इच्छित नाहीत. ते हे स्वतःसाठी किंवा त्यांच्या घरातील व्यक्तींसाठी, मित्रासाठी करत आहेत.'
विशेष म्हणजे ट्रम्प यांच्यांच पक्षाचे काँग्रेसमन थॉमस मास्सी यांनी अनेक दिवसांपासून एप्स्टिन फाईल संपूर्णपणे रिलीज करण्यात यावी अशी मागणी करत होते. त्यांनी देखील विरोधी पक्षाच्या सुरात सूर मिसळला आहे.