

पुणेः अमेरीका,चीन,रशिया या देशांची धोरणे क्लिष्ट असल्याने भारताला व्यापारासाठी युरोप अधिक चांगला आहे.तसेच आखाती देशांसह मध्ये आशियाई देशांसोबत आपण संबंध वाढवले पाहिजे असे मत परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी पुण्यात व्यक्त केले.
शनिवारी दुपारी पुणे पुस्तक महोत्सवात जयशंकर यांनी तरुणाईला मार्गदर्शन केले.त्यांची प्रकट मुलाखत नॅशनल बुक ट्रस्टचे संचालक युवराज मलिक यांनी घेतली. यावेळी त्यांनी परराष्ट्र धोरण, कुटनीतीसाठी रामायण महाभारत कसे महत्वाचे आहे यासह जगातील सध्याची व्यापारस्थिती यावर भाष्य केले.
काय म्हणाले जयशंकर...
अमेरीका,चीन,रशिया या देशांची धोरणे क्लिष्ट आहेत,तर जपान एकटाच आपल्या वेगवान गतीने पुढे जात आहे. त्यामुळे युरोपीय राष्ट्रांचे धोरण आपल्यासाठी योग्य वाटते.
- आपल्या शेजारीची राष्ट्रे लहान आहेत. त्यांच्यात अन आपल्यात कुरबुरी होत असली तरी संकटकाळी त्यांच्या पाठीशी भारतच धावून जातो.
-आखाती देशांत पूर्वापार व्यापार सुरु होता. तेथे आपल्यापेक्षाही मोठी हिंदु मंदिरे आहेत. कंबोडिया त्याचे उदाहरण आहे. हे संबंध पुन्हा वृध्दींगत करायला हवे.
- मी युपीएससी पास झालो नसतो तर उद्योजक व्हायला आवडले असते.
- तरुणांनो धाडसाने निर्णय घ्यायला शिका. स्पष्ट बोला,बोलला नाही तर जग तुम्हाला दाबून टाकेल.
- मोदी हे एकच नाव जगासाठी पुरेसे आहे. मी त्यांच्या टीममधील एक सदस्य आहे.
- जगात रामायण आणि महाभारत पोहोचले पाहिजे या हेतूने मी माझ्या पुस्तकांत ती उदाहरणे येतात.
- श्रीकृष्ण अन हनुमान हे उत्तम कुटनितीकार होते. त्यांना जगासमोर आणले पाहिजे.
-१९८३ मध्ये भारताने क्रिकेट विश्वचषक जिंकला तेव्हा मोहिंदर अमरनाथ त्या संघाचे उपकर्णधार होते. ते आणि मी एकाच वयाचे आहोत. मी मोहिंदर अमरनाथ यांचे चरित्र देखील वाचले आहे. त्यातून मला वेगळी प्रेरणा मिळाली.
-आयुष्यात काय करायचे आहे हे माहित असले पाहिजे. यशस्वी होण्यासाठी, तुम्हाला जोखीम ही घ्यावीच लागेल.
-तुम्ही ज्या देशात राहता त्या देशाची संस्कृती व्यक्तीच्या जीवनावर प्रभाव पाडते.
- मी माझ्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर "द इंडिया वे" लिहिले. हे पुस्तक इंग्रजी, हंगेरियन आणि जपानी भाषेत अनुवादित केले गेले आहे.