Bangladesh Election 2026: मतदानापूर्वीच हिंदूची हत्या; 2024च्या उलथापालथनंतर आज निवडणूक, 299 जागांसाठी मतदान

Bangladesh Election 2026: बांग्लादेशात आज 299 जागांसाठी संसदीय निवडणूक होत असून, त्याचबरोबर 84 मुद्द्यांच्या सुधारणांवर जनमत चाचणीही घेतली जात आहे. विद्यार्थी आंदोलनानंतर माजी पंतप्रधान शेख हसीना यांची सत्ता गेली होती आणि सध्या मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार आहे.
Bangladesh Election 2026 Updates
Bangladesh Election 2026 UpdatesPudhari
Published on
Updated on

Bangladesh News: बांग्लादेशात आज (12 फेब्रुवारी) देशाचे भवितव्य ठरवणारी निवडणूक होत आहे. तब्बल 299 जागांसाठी मतदान सुरू असून, त्याचबरोबर 84 मुद्द्यांच्या सुधारणा पॅकेजवर जनमत चाचणीही घेतली जात आहे. सुमारे दीड वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार कोसळले होते. त्यानंतर नोबेल पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले.

या निवडणुकीत शेख हसीनांची अवामी लीग पक्षाला सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मुख्य लढत बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) आणि जमात-ए-इस्लामीमध्ये आहे.

दरम्यान, तब्बल 17 वर्षांनंतर देशात परतलेल्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचा मुलगा तारिक रहमान याच्याकडे संभाव्य पुढील नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे. त्याने रोजगारनिर्मिती, कायदा-सुव्यवस्था आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे आश्वासन देत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.

शेख हसीनांच्या मुलाकडून बहिष्काराची मागणी

शेख हसीना यांचे पुत्र सजीब वाजेद यांनी या निवडणुकांवर टीका करत मतदानाचा बहिष्कार करण्याचे आवाहन केले आहे. सध्याच्या राजकीय व्यवस्थेत लोकशाही संस्था कमजोर झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

Bangladesh Election 2026 Updates
SaaSpocalypse Explained: एका पाटलामुळं जागतिक टेक मार्केट हादरलं; भारतासह जगातील शेअर बाजार कोसळले

मुहम्मद युनूस काय म्हणाले?

अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी सांगितले की, ही निवडणूक फक्त सत्तांतरासाठी नसून, अनेक वर्षांच्या असंतोष, अन्याय आणि विषमतेविरोधातील जनभावनांचे प्रतिबिंब आहे.

मतदानापूर्वी आणखी एका हिंदूची हत्या

बांगलादेशमध्ये मतदान होत असताना, आणखी एका हिंदू व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. 28 वर्षीय रतन साहूकारची हत्या करण्यात आली आहे आणि त्याची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. त्याचा मृतदेह सकाळी 10 वाजता चंपारा परिसरात आढळून आला.

Bangladesh Election 2026 Updates
SaaSpocalypse Explained: एका पाटलामुळं जागतिक टेक मार्केट हादरलं; भारतासह जगातील शेअर बाजार कोसळले

निवडणुकीची माहिती

  • संसद – 300 जागा

  • बहुमत संख्या – 151

  • मतदानाचा दिवस – 12 फेब्रुवारी

  • मतदानाची वेळ – सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत

  • निकाल – 13 फेब्रुवारी

  • एकूण मतदार – 12.77  कोटी

  • पुरुष – 6.48 कोटी

  • महिला – 6.28 कोटी

  • तृतीय लिंग – 1,120

15 वर्षांत तरुण मतदारांची सर्वाधिक संख्या

  • एकूण उमेदवार – 2,028

  • राजकीय पक्षाचे उमेदवार – 1,755

  • अपक्ष उमेदवार – 273

  • महिला उमेदवार – 83

  • एकूण मतदान केंद्रे – 42,779

  • मतदान अधिकारी – 8 लाख

  • सुरक्षा अधिकारी तैनात – 9.58 लाख

यात लष्कर, हवाई दल, नौदल, रॅब आणि अन्सारमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे

सहभागी राजकीय पक्षांची एकूण संख्या – 50

प्रमुख राजकीय पक्ष :

  • BNP – 292

  • जमात-ए-इस्लामी – 225

  • जातिया पार्टी – 196

  • बांगलादेश इस्लामी चळवळ – 259

  • National Citizen Party (NCP) – 30

निवडणुकांचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी 394 आंतरराष्ट्रीय निवडणूक निरीक्षक आणि १९७ परदेशी पत्रकार ढाक्यात पोहोचले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news