SaaSpocalypse Patil Effect Explained
SaaSpocalypse Patil Effect ExplainedPudhari

SaaSpocalypse Explained: एका पाटलामुळं जागतिक टेक मार्केट हादरलं; भारतासह जगातील शेअर बाजार कोसळले

SaaSpocalypse Patil Effect: Anthropic च्या Claude AI च्या नव्या फिचरमुळे जागतिक सॉफ्टवेअर आणि IT सेवा उद्योगात मोठी उलथापालथ झाली. या बदलाच्या केंद्रस्थानी Anthropic चे CTO राहुल पाटील आहेत.
Published on

SaaSpocalypse Patil Effect Explained: जागतिक टेक मार्केटमध्ये फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात मोठी खळबळ उडाली. कारण होतं Anthropic या AI कंपनीने आपल्या Claude या मॉडेलचे नवीन फिचर लॉन्च केले. या एका घोषणेमुळे अवघ्या काही दिवसांत जगभरातील सॉफ्टवेअर आणि IT कंपन्यांच्या शेअर्समधून सुमारे 285 अब्ज डॉलर (साधारण 23 लाख कोटी रुपये) ची घसरण झाली. या क्रॅशला मार्केट एक्सपर्टनी नाव दिलं सास्पोकॅलिप्स (SaaSpocalypse).

या AI कंपनी मागे कोण आहे?

या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे राहुल पाटील. तो Anthropic चा CTO आहे. राहुल पाटील मूळचा बेंगळुरूचा. क्रिकेटप्रेमी आणि डोशाचा चाहता असलेला राहुल Microsoft, Amazon आणि Oracle सारख्या दिग्गज कंपन्यांत काम करून आला आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये त्याची Anthropic मध्ये CTO म्हणून नियुक्ती झाली आणि त्यानंतर अवघ्या काही महिन्यांत संपूर्ण SaaS इंडस्ट्री हादरली.

नेमकं काय घडलं?

Anthropic ने Claude या AI सिस्टममध्ये मोठा बदल केला. आधी Claude फक्त API देत होती म्हणजे इतर सॉफ्टवेअर कंपन्या तिच्यावर आपली उत्पादने बनवत होत्या. आता मात्र Anthropic ने थेट 11 इंडस्ट्री-स्पेसिफिक टूल्स लाँच केली आहेत.

यामुळे Claude स्वतःच —

• डील तपासू शकते
• कायदेशीर कागदपत्रांची तपासणी करू शकते
• कोड लिहू शकते
• टीममधली कामं करू शकते
• कर्मचाऱ्याशिवाय तासन्‌तास काम करू शकते

सोप्या शब्दांत सांगायचं तर Claude आता डिजिटल कर्मचारी बनला आहे.

गुंतवणूकदार का घाबरले?

जर AI स्वतःच कायदेशीर काम, फायनान्स अ‍ॅनालिसिस किंवा IT ऑपरेशन्स करू शकत असेल, तर कंपन्या महागड्या सॉफ्टवेअर सबस्क्रिप्शनसाठी किंवा कन्सल्टिंगसाठी पैसे का देतील? यामुळे मार्केटमध्ये खळबळ उडाली.

त्याचा परिणाम लगेच दिसला Salesforce, Intuit, Adobe या कंपन्यांचे शेअर्स घसरले. कायदेशीर माहिती क्षेत्रातील कंपन्या Thomson Reuters आणि RELX मध्येही मोठी घसरण झाली. भारतामध्ये Infosys आणि Tata Consultancy Servicesचे शेअर्स सुमारे 7% घसरले.

SaaSpocalypse Patil Effect Explained
IT Stocks Crash: AI कंपनीच्या टूलमुळे शेअर बाजारात खळबळ; IT शेअर्स कोसळले, भारतीय कंपन्यांवर मोठं संकट

राहुल पाटीलचं नेमकं योगदान काय?

राहुल पाटीलने AI च्या ग्लॅमरस पार्टऐवजी पायाभूत गोष्टींवर भर दिला —

• खर्च कमी करणे
• वेग वाढवणे
• सिस्टिम स्थिर ठेवणे

त्याने महागड्या GPU वर Claude अधिक कार्यक्षम चालेल अशी रचना केली. एकाच हार्डवेअरमधून जास्त आउटपुट कसं काढता येईल यावर त्याने भर दिला. यामुळे AI वापरण्याचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला. याचाच फायदा घेऊन Anthropic आता थेट कंपन्यांना “ऑलवेज ऑन” AI एजंट देऊ शकते. यामुळे मधल्या SaaS कंपन्यांना याचा मोठा फटका बसरणार आहे. वॉल स्ट्रीटमध्ये यालाच आता “Patil Effect” असं म्हटलं जातं.

भारतासाठीही मोठी बातमी

Anthropic बेंगळुरूमध्ये आपलं ऑफिस उघडत आहे. टोकियोनंतरचं हे दुसरं आंतरराष्ट्रीय केंद्र असेल. यामुळे भारतात AI इन्फ्रास्ट्रक्चर आणि टॅलेंटला मोठी चालना मिळणार आहे. राहुल पाटीलसाठी हा क्षण महत्त्वाचा आहे, कारण तो आपल्या शहरातूनच जगातील सर्वात प्रभावी AI कंपनीला चालवणार आहे.

SaaSpocalypse Patil Effect Explained
IND vs PAK Explained: भारत पाकिस्तान मॅचमुळे भारताला किती हजार कोटींचा फायदा होणार? एका सामन्याची किंमत किती?

आता पुढे काय?

Claude आता डिजिटल असिस्टंट राहिलेली नाही. तो डिजिटल वर्कर बनला आहे. आणि त्यामुळे संपूर्ण सॉफ्टवेअर सर्व्हिसेस उद्योगासमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे, जर AI स्वतःच संपूर्ण काम करू शकत असेल, तर मग पारंपरिक सॉफ्टवेअर कंपन्यांनी काय करायचं? याच प्रश्नाचं उत्तर येत्या काही वर्षांत जागतिक टेक उद्योगाचं भविष्य ठरवणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news