Bangladesh violence |बांगलादेशात मतदानापूर्वी हिंसाचार; आणखी एका हिंदू व्यापाऱ्याची चाकूने भोसकून निर्घृण हत्या

मयमनसिंह जिल्ह्यात धक्‍कादायक प्रकार, अल्पसंख्याक समुदायाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

Hindu trader murder Bangladesh
प्रातिनिधिक छायाचित्र.File Photo
Published on
Updated on

Hindu trader murder Bangladesh

ढाका : बांगलादेशात सार्वत्रिक निवडणूक मतदानाला अवघे काही तास उरले असतानाच हिंसाचाराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मयमनसिंह जिल्ह्यात एका ६२ वर्षीय हिंदू व्यापाऱ्याची त्यांच्याच दुकानात शिरून चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. सुसेन चंद्र सरकार असे मृताचे नाव असून, ते तांदळाचे व्यापारी होते. गलादेशात पंतप्रधानपदासाठी होणाऱ्या मतदानापूर्वी ही घटना घडल्याने अल्पसंख्याक समुदायाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दुकानात घुसून केला हल्ला

स्‍थानिक पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार , मयमनसिंहमधील त्रिशाल उपजिल्ह्यातील 'बोगर बाजार' चौकात सुसेन चंद्र सरकार यांचे 'भाई भाई एंटरप्राइज' नावाचे दुकान आहे. सोमवारी रात्री ११ च्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी दुकानात शिरून सुसेन यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. हत्या केल्यानंतर आरोपींनी दुकानाचे शटर ओढून तिथून पळ काढला.रात्री सुसेन घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला असता, दुकानात ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. त्यांना तातडीने मयमनसिंह मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


Hindu trader murder Bangladesh
Bangladesh violence | बांगला देशात आणखी एका हिंदूची हत्या; भारतात संताप

लुटीच्या उद्देशाने हत्या?

मृत सुसेन यांचा मुलगा सुजान सरकार याने या घटनेमागे लुटीचा उद्देश असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्याने सांगितले की, "आमचा अनेक वर्षांपासून तांदळाचा व्यवसाय आहे आणि आमचे कोणाशीही वैर नव्हते. गुंडांनी वडिलांची हत्या करून दुकानातील लाखो टका (बांगलादेशी चलन) लंपास केले आहेत."


Hindu trader murder Bangladesh
Bangladesh Violence | 'बांगलादेशात जिहादचे दोन चेहरे; पण दोघांचे लक्ष्य भारतविरोधीच' : तस्लिमा नसरीन यांची सडेतोड भूमिका

पोलीस तपास सुरू

त्रिशाल पोलीस ठाण्याचे अधिकारी (ओसी) मोहम्मद फिरोज हुसैन यांनी स्‍थानिक माध्‍यमांना दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या हत्येमागे नेमके कोण आहे आणि उद्देश काय होता, याचा पोलीस कसून तपास करत आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news