डेल्टा आणि ओमायक्रॉन मिळून बनवणार का कोरोनाचा खतरनाक स्ट्रेन ? शास्त्रज्ञ म्हणाले, हे… | पुढारी

डेल्टा आणि ओमायक्रॉन मिळून बनवणार का कोरोनाचा खतरनाक स्ट्रेन ? शास्त्रज्ञ म्हणाले, हे...

पुढारी ऑनलाईन : गेल्या एका वर्षात जगभरात कोरोनाच्या डेल्टा प्रकाराने प्रचंड हाहाकार माजवला आहे. तथापि, कोरोनाच्या या स्वरूपाचा धोका कमी होताच, कोरोनाचे अधिक अत्याधुनिक स्वरूप ‘ओमायक्रॉन व्हेरिएंट’ देखील जगाला वेठीस धरू लागले आहे. दक्षिण आफ्रिकेनंतर, ब्रिटन, युरोप आणि अमेरिकेत या नवीन प्रकाराची लागण झालेल्या लोकांची संख्या सातत्याने वाढत आहे. शास्त्रज्ञांनी याबाबत संशोधन सुरू केले असतानाच, आता त्यांना एक नवीन भितीदायक प्रश्न सतावू लागला आहे.

‘अंडे आधी की कोंबडी?’ संशोधकांनी शोधले उत्तर

लस उत्पादक कंपनी मॉडर्नाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पॉल बर्टन यांना जेव्हा विचारले गेले की, डेल्टा आणि ओमायक्रॉन प्रकार एकत्रितपणे नवीन विकसित व्हेरियंटला जन्म देऊ शकतात का? तेव्हा ते म्हणाले की, हो शक्य आहे. या आठवड्यात ब्रिटीश संसदेच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान समितीसमोरच्या सादरीकरणादरम्यान, डॉ. बर्टन म्हणाले की, कोरोनाच्या दोन्ही धोकादायक प्रकारांचे संयोजन (डेल्टा आणि ओमायक्रॉन) एक अतिशय प्राणघातक सुपर व्हेरियंट तयार करण्याचा धोका आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला एकाच वेळी अस्तित्वात असलेल्या दोन्ही प्रकारांचा (डेल्टा आणि ओमायक्रॉन) संसर्ग झाला तर, अशावेळेस हा नवीन व्हेरियंट जन्माला येऊ शकतो.

Mumbai Omicron : फायजर लसीचे ३ डोस घेऊन अमेरिकेतून आलेल्या व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण

डॉ. बर्टन म्हणाले, “याविषयी डेटा उपलब्ध आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये काही पेपर्सही प्रकाशित झाले आहेत. ज्यात असे म्हटले आहे की, कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना दोन प्रकारच्या विषाणूची लागण झालेली आढळू शकते.” “युकेमध्ये डेल्टा आणि ओमायक्रॉनची प्रकरणे पसरली असल्याने, नवीन प्रकार जन्माला येण्याचा धोका लक्षणीय वाढला आहे,” असेही ते म्हणाले.

एक दिवसापूर्वीच ब्रिटनमध्ये कोरोनाचे ९३ हजार नवीन रुग्ण आढळले आहेत. ज्या लोकांचे जीनोम सिक्वेन्सिंग केले, त्यापैकी तीन हजारांहून अधिक लोकांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे आढळले. यूकेमध्ये सध्या ओमिक्रॉनच्या जवळपास 15 हजार केसेस आहेत. तथापि, शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की जीनोम सीक्वेंसिंग मर्यादित क्षमतेमुळे, ओमिक्रॉनचा प्रसार अचूकपणे शोधणे कठीण आहे.

बैलगाडी शर्यत बंदी उठली, आता अशी निवडा बैलजोडी

डॉ. बर्टन यांनी संसद सदस्यांना सांगितले की, दोन स्ट्रेन त्यांच्या जनुकांची अदलाबदल करू शकतात आणि धोकादायक प्रकार निर्माण करू शकतात. संशोधकांचा असा विश्वास आहे की, असा नवीन व्हेरियंट निर्माण होण्याची शक्यता खूपच कमी आहे, परंतु जर कोरोनाला संधी मिळाली तर ते शक्य देखील होऊ शकते.

Back to top button