मुंबई; पुढारी ऑनलाईन डेस्क
Mumbai Omicron : न्यूयॉर्क मधून मुंबईत आलेला एका २९ वर्षीय व्यक्ती शुक्रवारी ओमायक्रॉनबाधित आढळून आला. विशेष म्हणजे या व्यक्तीला कोणतेही लक्षणे नाहीत आणि त्याने फायजर लसीचे (Pfizer vaccine) तीन डोस घेतले आहे. याबाबतची माहिती बृहन्मुंबई महाननगर पालिकेने (BMC) दिली आहे. संबंधित व्यक्तीची विमानतळावर चाचणी करण्यात आली होती. त्यात तो पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्यानंतर त्याचे नमुने जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठविण्यात आले होते. दरम्यान, संबंधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या जवळच्या दोघांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.
एका वृत्तानुसार, संबंधित व्यक्तीला कोणतेही लक्षणे नाहीत. पण त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामुळे मुंबईतील ओमायक्रॉन रुग्णसंख्या वाढून १५ झाली आहे. यात मुंबई बाहेरील ५ रुग्णांचा समावेश आहे. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, (Mumbai Omicron) १३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत सापडलेल्या ओमायक्रॉनच्या १५ रुग्णांमध्ये कोणतेही गंभीर लक्षण दिसून आलेली नाहीत.
कोरोना संसर्गाचा नवीन व्हेरियंट भारतात वेगाने पसरत आहे. राजधानी दिल्लीत शुक्रवारी एकाच दिवशी १० ओमायक्रॉन बाधित आढळल्याने चिंतेत भर पडली आहे. दिल्लीत एकूण ओमायक्रॉन बाधितांची संख्या त्यामुळे २० पर्यंत पोहचली आहे. कोरोनाचा हा नवीन व्हेरियंट ११ राज्यांमध्ये पोहचला असल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्रात सर्वाधित ३२ ओमायक्रॉनबाधित आहेत. दिल्लीत आढळलेल्या नवीन रूग्णांनंतर देशातील एकूण ओमायक्रॉनबाधितांची संख्या ९८ पर्यंत पोहचली आहे. दिल्लीतील २० रूग्णांपैकी १० रूग्णांना रूग्णालयात सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्याकडून देण्यात आली आहे.
आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनूसार अवघ्या तीन आठवड्यांमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंट आफ्रिका तसेच यूरोपमध्ये वेगाने पसरला आहे.
हे ही वाचा :