‘ड्रॅगन’ला मंदीच्या झळा : चिनी शेअर बाजार गडगडला; ३ वर्षांत ६ लाख कोटी डॉलरचे नुकसान | China Stock Market Crash

‘ड्रॅगन’ला मंदीच्या झळा : चिनी शेअर बाजार गडगडला; ३ वर्षांत ६ लाख कोटी डॉलरचे नुकसान | China Stock Market Crash

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनमध्ये आर्थिक संकट अधिकाधिक गहिरे होत असल्याचे चित्र आहे. चीनमधील शेअर बाजाराची कामगिरी सातत्याने ढासळत आहे, यामुळे गेल्या तीन वर्षांत गुंतवणूकदारांचे ६ लाख कोटी डॉलर्सचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे गुंतवणुकदार चीनमधील आपली गुंतवणूक काढून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

शुक्रवारी The Shanghai Composite Index हा ६.२ टक्केंनी खाली आला आहे. ऑक्टोबर २०१८नंतरचा हा सर्वांत कमी साप्ताहिक निच्चांक ठरला आहे. तर दुसरीकडे Shenzhen Component Indexमध्ये ८.१ टक्के इतकी घट झाली आहे, ही घट गेल्या तीन वर्षांतील सर्वाधिक आहे. तर या वर्षीची तुलना केली तरी या दोन्ही इंडेक्समध्ये ८ टक्के आणि १५ टक्के इतकी अनुक्रमे घट झालेली आहे.

चीनमधील शेअर बाजारात CSI 300 हा निर्देशांक ब्लूचिप कंपन्यासाठी आहे. यात ३०० मोठ्या कंपन्यांचा सहभाग आहे. हा निर्देशांक ४.६ टक्केंनी खाली आला आहे. या निर्देशांकात वार्षिक ७ टक्के घट झालेली आहे. तर हा आठवडा या निर्देशांकासाठी ऑक्टोबर २०२२नंतरचा सर्वांत खराब आठवडा ठरला आहे, असे CNNने म्हटले आहे.

रिअल इस्टेटमधील मंदी, बेरोजगारी, कमी होत असलेला जन्मदर अशी काही संकटे चीनसमोर आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने चीनचा जीडीपी या वर्षी ४.६ टक्के राहील असा अंदाज वर्तवला आहे. ही घसरण २०२८मध्ये ३.५ टक्के इतकी खाली येईल असे मानले जाते. २०२३मध्ये चीनने ५.२ टक्के इतका जीडीपी नोंदवला होता. चीनचा जीडीपी हा गेल्या काही दशकांतील सर्वांत खालच्या पातळीवर पोहोचला आहे.

या आठवड्यात Evergrande या कंपनीची दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही कंपनी रिअल इस्टेटमधील चीनमधील सर्वांत महत्त्वाची कंपनी होती. या दिवाळखोरीमुळे चीनच्या अर्थव्यवस्थेसमोर नव्या समस्या सुरू झाल्या आहेत.

हे संकट लक्षात घेत चीनने व्यावसायिक बँकाचा रिअल इस्टेटमध्ये होणारा कर्जपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच चीनमधील वित्तीय क्षेत्र परकीय कंपन्यांनाही खुले करण्यात आले आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news