‘मध्य-पूर्वे’तील तणाव शिगेला; जॉर्डनमध्ये ड्रोन हल्ल्यात ३ अमेरिकी सैनिक ठार; अमेरिका चौताळली | पुढारी

'मध्य-पूर्वे'तील तणाव शिगेला; जॉर्डनमध्ये ड्रोन हल्ल्यात ३ अमेरिकी सैनिक ठार; अमेरिका चौताळली

पुढारी ऑनलाईन डेस्क : जॉर्डन येथील अमेरिकेच्या एका लष्करी चौकीवर ड्रोन हल्ला झाला आहे. यात अमेरिकेच तीन जवान ठार झाले आहेत, तर ३० सेवा कर्मचारी जखमी झाले आहेत. या हल्ल्यामुळे इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्षाला नवे वळण मिळाले आहे. ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या संघर्षात अमेरिकन सैनिक मारले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या हल्ल्याता प्रत्युत्तर द्यावे लागेल, असे म्हटले आहे. (Jordan US Troop Drone Attack)

सीरिया आणि जॉर्डनच्या सीमेवर टॉवर २२ नावाने ही चौकी आहे. या चौकीवर सीरियातून ड्रोनने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामाले इराणचे पाठबळ असणाऱ्या काही दहशतवादी संघटना असू शकतात, असे अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. ही बातमी सीएनएन या वेबसाईटने दिली आहे.  (Jordan US Troop Drone Attack)

बायडेन म्हणाले, “आम्ही या संदर्भातील माहिती गोळा करत आहोत. पण इराणचे पाठबळ असलेल्या काही कट्टरपंथीय दहशतवादी संघटनांनी हे कृत्य केल्याचे आमची माहिती आहे.”

तर दुसरीकडे इराणने या हल्ल्याशी कसलाही संबंध नसल्याचे म्हटले आहे. इराणच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते नासेर कन्ननी म्हणाले, “प्रांतिक पातळीवर काम करणारे विरोधी घटक इराणकडून आदेश घेत नाहीत. या भागात आधीच मोठा तणाव आहे, आम्हाला यात भर घालायची किंवा नवी युद्ध सुरू करायचे नाही.”

हेही वाचा

Back to top button