

पुढारी ऑनलाईन डेस्क : इराकच्या उत्तरेकडील एरबिल शहराजवळील एका विद्यापीठाच्या वसतिगृहाला लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला असून १८ जण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी (दि.८) सायंकाळी एरबिलच्या सोरान शहरात घडली. आग आटोक्यात आणण्यात आल्याचे स्थानिक माध्यमांनी सांगितले.
सोरानच्या आरोग्य संचालनालयाचे प्रमुख कमराम मुल्ला मोहम्मद यांच्या म्हणण्यानुसार, एरबिलच्या पूर्वेकडील सोरान या छोट्या शहरातील एका इमारतीत आग लागली. स्थानिक माध्यमांनी मृतांच्या संख्येची पुष्टी केली. शुक्रवारी रात्री आग विझवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा :