Iran-Pakistan : इराणमध्ये ९ पाकिस्तानींची गोळ्या झाडून हत्या | पुढारी

Iran-Pakistan : इराणमध्ये ९ पाकिस्तानींची गोळ्या झाडून हत्या

पुढारी ऑनलाईन डेस्क : इराणने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याच्या अवघ्या १२ दिवसानंतर दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. पाकिस्तानला लागून असलेल्या इराणच्या दक्षिण-पूर्व भागात शनिवारी अज्ञात बंदूकधाऱ्यांनी नऊ जणांची गोळ्या झाडून हत्या केली. इराणमधील पाकिस्तानचे राजदूत मुदस्सीर टिपू यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. हे पाकिस्तानी इराणच्या दक्षिण-पूर्व सीमा भागात काम करायचे. हे दहशतवाद्यांचे घृणास्पद कृत्य असल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे.

सर्व मृत पाकिस्तानी मजूर होते. ते कार दुरुस्तीच्या दुकानात राहत होते आणि काम करत होते. या हल्ल्यातून बचावलेल्या लोकांचे म्हणणे आहे की, तीन सशस्त्र लोक घरात घुसले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला.

इराणची राजधानी तेहरानमध्ये तैनात असलेले पाकिस्तानचे राजदूत मुदस्सीर टिपू यांनी शनिवारी सांगितले की, इराणमधील सारवानमध्ये नऊ पाकिस्तानींच्या हत्येमुळे त्यांना धक्का बसला आहे. हे भयावह आहे. दूतावास पीडितांच्या कुटुंबियांसोबत आहे. आम्ही त्यांना पाठिंबा देतो. इस्लामाबादने तेहरानला या प्रकरणात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा : 

Back to top button