Google Doodle : सरत्या वर्षाला निरोप देणारं हटके ‘गुगल डूडल’

Google Doodle
Google Doodle

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज ३१ डिसेंबर. २०२३ या वर्षाचा शेवटचा दिवस. अवघ्‍या काही तासांमध्‍ये  संपूर्ण जग नववर्षात पदार्पण करणार आहे. गुगलने नववर्षानिमित्त डूडल बनवले आहे. गुगलने या डूडलद्वारे 2023 वर्षाचा निरोप घेत आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने नववर्षाचे स्वागत करण्याच्या तयारीत व्यस्त आहे. गुगलने आपल्‍या डूडलच्‍या माध्‍यमातून नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहे. 'गुगल'ने या डूडलला नवीन वर्षाची संध्याकाळ असे नाव दिले आहे. यामध्ये तुम्हाला 2023 आणि नवीन वर्ष 2024 ची एक छोटीशी झलक दिसेल. हे एक ॲनिमेशन आहे. (Google Doodle)

Google Doodle : आजच्या गुगल डूडलमध्ये काय खास आहे?

कोणताही विशेष प्रसंग असला की, गुगल त्याचे डूडल नक्कीच बनवते. प्रत्येक खास दिवस चांगला बनवण्यात गुगलची मोठी भूमिका आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला गुगलने आकर्षक डूडल बनवले आहे. तुम्ही तुमच्या स्क्रीनवर गुगल चालू केल्यास आज तुम्हाला डूडल बदललेले दिसेल. गुगल डूडलद्वारे 2023 वर्षाचा निरोप घेत आहे. नवीन वर्ष 2024 साठी 'काऊंटडाऊन' (३,२,१) सुरू झाले आहे. डूडलचे विविध रंग आकर्षक बनवण्यात सर्वात मोठी भूमिका बजावत आहेत. या डिझाइनमध्ये प्रसंग, आनंद आणि उत्साह एकत्र दिसून येतो.

नवीन वर्षाचे स्वागत करणारी अनेक छायाचित्रे

वर्षाच्या शेवटच्या डूडलमध्ये तुम्हाला 2023 हे गुगलच्या अगदी वर लिहिलेले दिसेल. यामध्ये ओ अक्षराच्या जागी हसतमुख इमोजी लावण्यात आले आहे. याशिवाय संपूर्ण डूडलला सेलिब्रेटी लूक देण्यात आला आहे. नुसतं बघून असं वाटतं की हा 2023 वर्षाचा शेवटचा दिवस असणार आहे. याशिवाय, जेव्हा तुम्ही डूडलवर क्लिक करता आणि पुढे जाता तेव्हा वरच्या बाजूला नवीन वर्षाची संध्याकाळ लगेच दिसते. नववर्षाचे स्वागत करणारी अनेक छायाचित्रेही पाहायला मिळतात.

गूगल  डूडल काय आहे?

गुगल डूडल हे गुगलचे एक खास असं फीचर आहे. १९९८ मध्ये गुगलने पहिल्यांदा डूडल तयार केले होते. गुगलचे संस्थापक लॅरी पेज आणि सर्जे ब्रिन यांनी डिझाईन केले होते. त्याच्या नंतर गुगल प्रत्येक खास प्रसंग साजरा करण्यासाठी  डूडल तयार करते.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news