Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलने साकारले खास डूडल

Republic Day Google Doodle
Republic Day Google Doodle
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन : आज प्रजासत्ताक दिनानिमित्‍ताने (Republic Day) गुगल डूडल हाताने कागदापासून तयार केले आहे. आजचे गुगल डूडल (Republic Day) अहमदाबाद, गुजरातमधील कलाकार पार्थ कोठेकर यांनी चित्रित केले आहे. 1950 मध्ये या दिवशी भारताने लिखित संविधान स्वीकारून स्वतःला एक सार्वभौम, लोकशाही आणि प्रजासत्ताक घोषित केले. यामध्ये राष्ट्रपती भवन, इंडिया गेट, मोटरसायकल स्वारांसह परेडमधील अनेक चित्ररथ यामध्ये साकारले आहेत.

गुगल डूडल कलाकार पार्थ कोठेकर म्‍हणाले…

अहमदाबाद येथील कलाकार पार्थ कोठेकर यांनी सांगितले की, जेव्हा प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) डूडलवर काम करण्याबद्दल संपर्क करण्यात आला तेव्हा मला त्‍यावर विश्वास बसला नाही. मी अनेक वेळा ईमेल पुन्हा-पुन्हा वाचला, कारण मला त्यावर विश्वास बसत नव्हता. आनंदाने मी माझ्या आई आणि बहिणीला याबद्दल माहिती दिली. मला अशी खूप मोठी संधी मिळेल असे कधीच वाटले नव्हते, असे ते म्‍हणाले.

-हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news