

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज जागतिक वसुंधरा दिन (World Earth Day 2023). दरवर्षी २२ एप्रिल रोजी जगभरात वसुंधरा दिन साजरा केला जातो. आपल्या पृथ्वीचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. लोकांना अधिक पर्यावरणपूरक होण्यासाठी प्रोत्साहित करणे, पृथ्वीचे संरक्षण करणे आदी उद्दीष्टांसह हा दिन साजरा केला जातो. गुगलही हटके असं डूडल करत जागतिक वसुंधरा दिन साजरा करत आहे. जाणून घ्या गुगलने केलेल्या डूडलबद्दल. ( Earth Day 2023)
जागतिक वसुंधरा २०२३ निमित्ताने गुगलने हवामान बदलाविरूद्ध कृती करण्यासाठी आपण सर्वजण लहान-मोठ्या मार्गांनी एकत्र कसे काम करू शकतो यावर प्रकाश टाकला आहे. आपली पृथ्वी वाचवण्यासाठी व्यक्ती आणि समुदाय एकत्र कसे कार्य करू शकतात. हे आजच्या डूडल मधून स्पष्ट होत आहे. आपण वापरत असलेली वीज, आपण खातो ते अन्न आणि आपण खरेदी करत असलेल्या गोष्टींपर्यंत या सर्वांचा जगभरातील हवामान बदलामध्ये कसा परिणाम करू शकते हे दाखवलं आहे.
जागतिक वसुंधरा दिन २०२२ च्या निमित्ताने गुगलने केलेल्या डूडलमध्ये अॅनिमेशनची मालिका दाखविण्यात आली होती. याद्वारे हवामान बदलाचा पृथ्वीवर कसा परिणाम होतो यावर प्रकाश टाकला होता. यात वेगवेगळ्या वर्षातील पृथ्वीवरील चित्र दिसत होती.
दरवर्षी 22 एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा दिवस साजरा केला जातो. सध्या जगभरातील एकूण १९३ देश हा दिवस साजरा करत आहे. हा दिन पहिल्यांदा १९७० मध्ये साजरा केला. आजचा वसुंधरा दिन आपण ५३ वा साजरा करत आहोत. दरवर्षी एक थीम ठरवली जाते. त्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाची थीम ही 'इन्वेस्ट इन अवर प्लॅनेट' "Invest in Our Planet."अशी आहे.
हेही वाचा