'मी खरी मैत्रिण गमावली' : इन्स्टाग्रामवरील प्रसिद्ध श्वान ओलिव्हियाचे निधन | Hammy and Olivia | पुढारी

'मी खरी मैत्रिण गमावली' : इन्स्टाग्रामवरील प्रसिद्ध श्वान ओलिव्हियाचे निधन | Hammy and Olivia

पुढारी ऑनलाईन डेस्क : इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध असलेल्या हॅमी आणि ऑलिव्हिया (hammyandolivia) या श्वानांच्या जोडीतील ओलिव्हियाचे बुधवारी आकाली निधन झाले. ऑलिव्हियाची कीडनी बिघडल्याने तिचे निधन झाल्याचे, तिचे मालक ख्रिस यांनी @hammyandolivia या अकाऊंटवर जाहीर केले. अतिशय भावनिक झालेल्या ख्रिसने ओक्साबोक्शी रडत ही माहिती चाहत्यांना दिली. त्यानंतर या अकाऊंटवर हजारो कमेंट पडलेल्या आहेत. (Hammy and Olivia)

हॅमी आणि ओलिव्हिया ही ख्रिस यांची कोर्गी जातीचे श्वान. या दोघांना माणसाची भाषा आली तर ते कसे बोलतील, आपल्या भावना कशा व्यक्त करतील, याचे आणि तसेच या दोघांचे बरेच व्हिडिओ, इतर पोस्ट ख्रिस या अकाऊंटवर शेअर करत असत. त्यांच्या या अकाऊंटला इन्स्टाग्रामवर १४ लाख फॉलोअर्स आहेत. तर या व्हिडिओंना लाखोंत व्हिव मिळाले असतात. त्यांच्या या व्हिडिओतून ख्रिस यांच्या मांजराचेही दर्शन व्हायचे. Hammy and Olivia

पण ख्रिसने काल एक व्हिडिओ बनवून ओलिव्हियाचे निधन झाल्याचे चाहत्यांना कळवले. “मी अक्षरशः उद्धवस्थ झालो आहे, मला तुमच्या आधाराची गरज आहे. ती माझी सर्वांत जवळची मित्र होती,” असे ख्रिसने म्हटले आहे. ओलिव्हियाची किडनी खराब झाली होती, आणि तिने शांतपण शेवटचा श्वास घेतला असे ख्रिस यांनी म्हटले आहे. ख्रिस यांच्या या व्हिडिओवर ४७ हजारच्या वर कमेंट पडल्या आहेत.

Back to top button